शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

पहिलं भांडण

 

"प्राची अगं मला ना एक पुस्तक हवं आहे. खरं तर काल पण मी आलो होतो पण तू झोपली होतीस. देतेस का मला ?"

"अरे जा ना. प्राची खरं अंग काल पण आला होता तो "

"OK विवेक थांब आणते कोणतं हवं आहे?"

"अगं ते वर आहे मी ही येतो तुझाबरोबर "

ते दोघे रम मध्ये जातात

"हा कोणतं पुस्तक ते बघ. मला अभ्यासाला बसायचं आहे लगेच ."

"प्राची ऐक ना. I am sorry मी तुला जास्त वेळ नाही देऊ शकलो मागच्या काही दिवसात "

प्राची “No big deal yar. काय फरक पडतो? Well मला तर तू कुठे आहेस, तू कोणत्या colleges आणि  out of the India Universities ना apply करतोस हे ही माहित नव्हतं. अर्थात तू मला कशाला सांगशील म्हणा!”

विवेक दुखावला जातो. "असं का म्हणतेस? अगं आजीही तब्येत अचानक खराब झाली. मला काहीच सुचत नव्हतं. She is very close to me. असं काही झालं ना की मी shell मध्ये जातो”

प्राची “अरे मला कसं काहीही कळेल? आणि तुला share करावंसं नाही वाटलं का? मैत्रीण म्हणतोस ना मला”

विवेक “This is how I am. मला नाही जमत असं. But I am sorry. “

प्राची “I don’t know what to say honestly. I am hurt and shocked right now. Please give me some time and space. आणि महत्वाचं म्हणजे मी १०वी त आहे मला अभ्यासावर focus करू दे. तू काय निघून जाशील बाहेरच्या देशात.”

विवेक “अगं बाई फक्त apply केलं आहे आता”

प्राची एकदम रुक्षपणे म्हणाली “anyway… घे कोणतं हवं आहे ते पुस्तक. माझी परत उद्या test आहे मला अभ्यास करायचा आहे”

विवेक वैतागात म्हणतो -"नको मला कोणतंच जातो मी "

प्राची “as you wish, bye”

विवेक “ this is not fare yar. मी बोलायला आलेलो तुझ्याशी”

प्राची “विवेक तुला वेळ असेल तेव्हा तू भेटणार तुला बोलायचं असेल तेव्हा तू येणार . What about me? मला काय वाटतं याचा विचार कधी तरी केला आहेस का? मला आता खरंच अभ्यासाला बसायचं आहे आपण नंतर बोलू या please”

विवेक निराश होऊन निघून जातो. प्राची वाईट वाटून दरवाजा लावून घेते

 

 

 

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

आई आणि पाऊस

 आई गेली आणि तिचं पावसामुळे हरखणं गेलं
आई गेली आणि तिचं पावसावर रुसणं गेलं
आई गेली आणि तिचं पावसात सगळी कामं सोडून निरखणं गेलं
आई गेली , माझं मायपण हरवलं
पावसा माझी माय बनून ये आणि मला कवेत घे

सोमवार, ३१ जुलै, २०२३

तिच्या शाळेला दिलेली पहिली भेट

 आठ एक दिवस गेले. प्राची चा विवेक बरोबर काही contact नव्हता.  तिची सतत घालमेल व्हायची. याला एकदाही आपल्याला contact करावा असं वाटत नसेल का?की मी त्याच्या दृष्टीने अजिबात च important नाही? मुळात प्रश्न परत हाच येतो की मी त्याचा एवढा विचार करते च का आहे? शेवटी तिने फक्त अभ्यासावर concentrate करण्याचं ठरवलं. गेला हा खड्ड्ड्यात जाऊ दे. एक सुंदर स्वप्न संपलं आता जागं व्हायचं आणि फक्त आपल्या कामाला लागायचं बस्स.

प्राची डोक्यात विचार येऊ नयेत म्हणून रात्रंदिवस फक्त अभ्यास करायची. आई बाबा जेवायला हाक मारून थकायचे. एके दिवशी शेवटी आईने ताट तिच्या रुममध्येच आणलं. "प्राची काय चालू आहे हे? अगं तू फक्त दहावीत आहेस. Don’t get so burn out. चल जेवून घे. उद्यापासून रोज चुपचाप घरच्या जेवायच्या वेळा पाळायच्या आणि आमच्या बरोबर जेवायचं कळलं ?”

प्राची “Okay ग”

आई “चल जेव आणि आज जरा लवकर झोप खूप अति चालू आहे तुझं”

खूप दिवसांनी पोट्भर जेवल्यामुळे प्राचीला जरा आज झोप लागली.

अचानक दारावरची बेल वाजली. प्राची च्या आईने दार उघडलं. तर दारात विवेक उभा

आई “विवेक अरे ये आत ये ना”

विवेक “काकू प्राची आहे का? मला तिच्याकडून पुस्तक घायचं होतं "

आई “थांब हा बघते काय करते आहे ते . अरे तिने ना आज काल स्वतः:ला रम मध्ये कोंडून घेतलं आहे.  सतत अभ्यासच करत असते. प्राची ए प्राची. थांब दरवाजा बंद आहे "

आई येऊन रूमचा दरवाजा उघडून बघते तर प्राची गाढ झोपलेली दिसते.

“अरेच्या हिला झोप लागली वाटतं असंच पांघरूण न घेता झोपलं माझं बाळ." आई अंगावर दुलई घालते, गालावरून हात फिरवते. लाईट बंद करते आणि हॉल मध्ये येऊन विवेक ला सांगते “अरे झोपली आहे ती . काय झालं आहे या मुलीला काय माहीत . आज खूप दिवसांनी नीट जेवली आणि झोपली बघ”.

विवेक “काकू हरकत नाही मी उद्या येतो”.

हिरमुसला विवेक निघून जातो.

 प्राची सकाळी ६ वाजता उठून आवरते.

आई -"अगं, एवढ्या सकाळी कुठे निघालीस?"

प्राची - "आई विसरलीस का? आज extra tests आहे त. तशीच शाळेत जाईन "

आई -" प्राची I am so sorry बेटा. I forgot. Breakfast बनवू का पटकन?”

प्राची - "आई I am already late. I will have something in the canteen. Please give me some money.”

आई -" हे घे हे केळ खा जाता जाता आणि हे पैसे. Please eat something healthy ok. I am so sorry ग.”

प्राची - "आई, it’s ok. चल मी गेले ग भेटू संध्याकाळी आता direct.”

विवेक सकाळी ९ला येतो

विवेक “काकू प्राची आहे का? मला तिच्याकडून पुस्तक घायचं होतं "

आई -" अरे मी विसरले होते. तिला आज extra tests आहेत आणि मग शाळा आता ती direct संध्याकाळी येईल. तू एक काम कर तिच्या रूममधून तुला हवं ते पुस्तक घे . उघडीच असेल रम तिची”

 

विवेक खूप विचार करून तिच्या रूममध्ये जातो. पुस्तक चाळताना त्याला मागे लपवलेली कवितांची वही दिसते. एका पानावर अश्रू ओघळलेले असतात आणि एक कविता दिसते

 

माझे क्षण

माझे क्षण होते भाळण्याचे, प्रेम करण्याचे

आणि आताचे सारे क्षण एकाकी रितेपणाचे

माझे क्षण एकाकी, कोणाची तरी वाट पाहणारे

अन

माझे क्षण मेघ झाले

माझे क्षण बरसून गेले

माझे क्षण झाले शांत रिते आभाळ

माझे क्षण फक्त माझेच राहिले

 

तारीख तो इथे नसलेल्या दिवसातली असते. त्याला अतिशय guilty वाटतं.

विवेक रूमच्या बाहेर येतो

आई -"काय रे मिळालं का काही ?"

विवेक - "नाही ना काकू. प्राची आली की मगच येतो . तिचा कधी होतो पण?"

आई -" दुपारी एक वाजता असतो. पण ती आज संध्याकाळी सहा वाजता यायची आहे "

विवेक - "Okay काकू. Bye”

विवेक घरी जाऊन गाडीची किल्ली आणतो.

"आई मला वेळ होईल. जेवायची वाट पाहू नकोस "

Kick मारून विवेक प्राची च्या शाळेत जातो. Security guard अडवतो

Security guard - "कोणाला भेटायचं आहे ?"

विवेक -"प्राची, प्राची कुलकर्णी. १०वी "

Security guard - "तुम्ही कोण तिचे? भाऊ का ?"

विवेक -"नाही, नाही. शेजारी आहे . "

Security guard - "नाही भेटता येणार. फक्त नातेवाईकच अलाउट आहेत बघा "

विवेक तहान भूक विसरून तिथे च वाट बघत थांबतो. शेवटी एकदाचे सहा वाजतात आणि प्राची सायकल वर बाहेर येते

विवेक -" प्राची प्राची”

प्राचीच्या काळजाचा ठोका चुकतो. आपण बहुतेक स्वप्न बघत आहोत असं तिला वाटतं

खूप राहिल्यासारखं दाखवत ती त्याला म्हणते-“ अरे विवेक तू कसा काय इथे ?”

विवेक -" प्राची अगं तुलाच भेटायला आलो होतो पण या काकांनी येऊ नाही दिलं आत मध्ये. I want to talk to you”

प्राची-“I am really tired Vivek, I am out from morning 6. Can we please talk tomorrow?”

विवेक -" प्राची please २मिनटं  बोल ना”.

प्राची-“ उद्या भेटू हा bye”

विवेक हताशपणे तिच्या मागोमाग त्याच्या गाडीवर निघाला.

प्राची आनंदली आणि रागावली दोन्ही होती . आज हा प्रथमच शाळेत भेटायला आला . पण ही काय जागा आहे का भेटायची घरी यायचं ना आणि आता याला काय हवं आहे ? अंग पण finally I met him. Oh my god! I saw him

प्राची ने cycle park केली.

आई-“ कशी झाली राजा test आणि शाळा ?दमला का माझा बच्चा ? चल मस्त हे पोहे खा. मी तुझ्या आवडीचा आलं घालून चहा टाकते मस्त "

प्राची "आई पोहे मस्त झालेत .

आई -"अगं प्राची कालपासून विवेक घरी येतो आहे बघ. त्याला पुस्तक हवं होतं कसलं. काल तू झोपली होतीस तेव्हा आला आणि आज सकाळी ला गेलेलीस तेव्हा आलेला. अरे हे बघ आला परत विवेक. विवेक पोहे खातोस का? "

विवेक आणि त्याच्या पाठोपाठ निरुपा पण येते

विवेक बकाबका पोहे खातो

निरुपा -"दिवसभर उपाशी राहिलं की असंच होणार . अगं माधुरी दिवसभर न खाता पिता कुठे भटकत होता काय माहीत "

प्राची आणि विवेक दोघे एकमेकांकडे बघतात. प्राची ला फार वाईट वाटतं ती हळूच त्याला म्हणते “I am sorry”

विवेक तिला हळूच म्हणतो “I am sorry too.”

बाकीचं नंतर असं खुणावत दोघेही चहा पिऊन शांत होतात

 

 

 

 

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

त्याच्या घराला पहिली भेट

 आणि मग मध्ये खूप दिवस गेले. प्राची १०वीचे classes, tests आणि शाळा यामध्ये खूप busy होऊन गेली. खरं तर प्राचीला class ला गेल्यावर, शाळेत गेल्यावर विवेकची खूप आठवण यायची. त्याची एक तरं झलक मिळावी असं तिला सतत वाटत रहायचं. त्याच्याशी खूप बोलावं त्याच्याबरोबर परत परत ride ला जावं असं तिला वाटायचं. त्याचं हसणं त्याचं बोलणं आठवलं की काळजात एक कळ यायची. कसं बरं त्याला भेटायला मिळेल ? एकदा phone करून बघावा का? नको नको. त्याने तर आपल्याला एकदा पण करायचा प्रयत्न केला नाही. तो तर ना पुस्तक मागायला आला ना त्याने विचारलं की मला काही अडलं आहे का. त्याला बहुतेक माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर असं गळ्यात पडल्यासारखं वाटेल ना. माझं काही चुकलं असेल का ? मी दिसायला किंवा वागायला इतकी वाईट आहे का की त्याला परत कधीच माझ्याशी contact करावासा नाही वाटला? बरं मी केला contact त्याला आणि त्याने मला ghost केलं तर? छे छे नकोच ते. मी आपलं स्वतःला अभ्यासात इतकं गुंतवून घेते की मला त्याची आठवण च नाही आली पाहिजे पण इतकं सोपं नाही ना ते माझ्यासाठी.  अगं बाई कोण तो आता आलेला विवेक काय एवढं त्याच्यात इतकं का गुंतावं मी त्याच्यात असं का होतंय मला?  हे असं झुरणं का तेच तिला कळत नव्हतं . हे नक्की काय आहे? इतकं त्या माणसामध्ये काय आहे? या आधी इतकं वाईट तिला कधी वाटलं नव्हतं. रोज असं वाटायचं एकदा तो नुसता दिसावा कधी तरी च्या बाहेर तो आला आहे असा भास तिला व्हायचा.

Be yourself प्राची. Just work on yourself. Just do your studies and that’s it.

एके दिवशी निरुपा अचानक घरी आली. "माधुरी आहेस का ग ?"

माधुरी-"अगं निरुपा ये ना. खूप दिवसात दिसली नाहीस ग."

निरुपा-"अगं हो आम्ही ना कर्जत ला गेलेलो माझ्या सासूबाईंची अचानक pacemaker surgery करावी लागली".

माधुरी-"अरे बापरे . अगं कळवायचंस की. आमची काही मदत झाली असती"

निरुपा-"अगं प्राची आणि तू आज माझ्याकडे जेवायला येता का? मी एकटीच आहे. हे दोघे अजून कर्जत लाच राहिले आहेत. जरा सोबत होईल मला आणि जरा बरं पण वाटेल "

माधुरी-"अगं निरुपा तूच ये ना इथे . Already तुझी खूप दगदग झाली असेल "

निरुपा-"अगं तुम्ही या ना दोघी. मी फक्त खिचडी टाकते. "

माधुरी-" बरं मग मी tomato soup घेऊन येते. येतो आम्ही ७.३० ला . चालेल ना ?”

माधुरी-"प्राची, अगं प्राची”

प्राची रूम मधूनच ओरडली-“आई काय ग? अभ्यास करते आहे.”

माधुरी-" आपल्याला आज देशपांड्यांकडे dinner ला जायचं आहे. काय झालं माहिती का….”

प्राची ला पुढलं काही ऐकूच आलं नाही. She was already on cloud nine. आता आपण काय घालू या कसं दिसू या म्हणजे विवेक impress होईल असा ती विचार करत राहिली . नको नको सगळ्यांच्या लक्षात येईल आपण आपलं normal च जाऊ या.

प्राची तयार होऊन खाली आली. तिने फक्त डोळ्यात काजळ घातलं

माधुरी-"काय गं? आज हे काय नवीन ?"

प्राची- "अगं जरा स्वतः साठीच असा विचार केला."

माधुरीने ऐकावं ते नवलच असा विचार केला आणि त्या देशपांड्यांकडे निघाल्या

आता विवेक असा समोर दिसेल आपण कसं करायचं  त्याच्यावर रागवायचं का त्याच्याशी खूप बोलायचं? तिच्या छातीत तो आता दिसणार हा विचार करूनच धडधडायला लागलं. तिने थरथरत घराची bell वाजवली.

निरूपाने दार उघडलं.

निरूपा-“या ग. Thank you so much for coming”

माधुरी-”Thank you काय अगं. Come on.”

निरूपा-“ लगेच बसुया का जेवायला? प्राची ला पण अभ्यास असेल ना ? कसा चालू आहे बाळा १०विचा अभ्यास ?”

प्राची- " छान चालू आहे काकू. पण आपण ३च ? बाकीचे सगळे ?”

माधुरी-” अगं काय कमाल करतेस. मघाशी सगळं सांगितलं की मी तुला ओरडून ? विवेक च्या आजीची emergency मध्ये pacemaker surgery झाली. विवेक आणि त्याचे बाबा तिथेच आहेत. निरूपाची रजा संपली”

प्राची- " Oh I missed that.” तिच्या डोळ्यात दुःखाने अगदी पाणी जमा व्हायला लागलं. किती ही निराशा!

निरूपा-“ अगं प्राची तू का रडतेस ?“

माधुरी-” खूप sensitive आहे अगं ती . प्राची बऱ्या आहेत ग त्या.”

निरूपा-“  Bandage आहे ना अजून म्हणून ते दोघे अजून तिथे राहिले आहेत.  चला गरम आहे तोवर जेवू या”

प्राची ची भूक च मेली. तिघी जेवल्या . निरुपा आणि माधुरी मागचं आवरत होत्या.

निरूपा-“  प्राची bore होत असेल तर ती रूम बघ. विवेकची आहे. काही तरी interesting मिळेल तुला”

नेकी और पुछ, पुछ असं झालं प्राचीला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन ती विवेकच्या खोलीत गेली. त्याच्या table वर अनेक universities चे brochures पडले होते. भारताबाहेरच्या universities चे brochures पण तिथे होते

प्राची-“ निरूपा काकू हे काय आहे?”

निरूपा-“ अगं मंदार म्हणजे विवेकच्या बाबांच्या सांगण्यावरून त्याने भारताबाहेर पण applications टाकले.”

प्राची ला त्या पुढचं काहीच सहन होईना

प्राची -"काकू आई मी घरी जाते. खूप अभ्यास राहिला आहे”

प्राची रूममध्ये आली. दुःखाचा आवेग तिला सहन नाही झाला. तिने अश्रुना त्यांची वाट मोकळी करून दिली

सोमवार, १७ जुलै, २०२३

पहिलं composition आणि पहिली कविता

 प्राची ला सोडून विवेकने गाडी पार्क केली पण त्याला संध्याकाळ आठवत होती. विवेकला सगळ्यात जास्त लक्षात राहिले प्राचीचे डोळे. खूप curious, खूप नवीन शिकण्याची इच्छा, जग जिंकून घेण्याची इच्छा, खूप प्रेम करायची इच्छा हे सगळं दिसलं त्याला तिच्या डोळ्यात. आणि अचानक आज त्याला त्याची गिटार बाहेर काढावीशी वाटली खूप दिवसांनी.

 काही तरी सुचलं खोल आत काहितरी आहे ज्याला बाहेर पडावंसं वाटतंय हे असं आज पर्यंत कधीच नाही झालं आपण तर आजपर्यंत त्याने रूम मध्ये जाऊन case मधून गिटार काढली , तारा पिळल्या आणि सूर झडले जे बाहेर पडलं ते त्याने आज पर्यत कधीच नव्हतं कुठे ऐकलेलं. हे काय झालं, हे काय होतंय आपल्याला?आज पर्यत आपण फक्त सरांनी शिकवलेलं किंवा ऐकलेलं गाणं वाजवलं. हे काय आपल्याला सुचलेलं composition होतं का? त्याने सहज mobile वर record करून ठेवलं. हे काय सगळं त्या डोळ्यांमुळे झालं? खरंच?

 

प्राची घरात पोचली . माधुरी सुवासिक फुलं देवाला वाहून ध्यान करत बसली होती. तिला disturb होऊ नये म्हणून प्राची हळूच दार न वाजवता रूम मध्ये जाऊन fresh झाली. विवेकचं आजूबाजूला असणं आपल्याला आवडतंय हे तिच्या लक्षात आलंय. खरं तर ८वी पासून वर्गातले एक दोघे आपल्याला आवडतात असं तिला वाटत होत पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून तिने तिच्या अभ्यासावर आणि स्पर्धांवर focus केलं होतं. पण यावेळेला कितीही प्रयत्न केला तरी विवेक सतत आठवत होता अगदी पहिल्या दिवशी पासून ते आता सोडण्यापर्यंतचे सगळे क्षण तिला सतत आठवत होते. खरं तर आठवतं म्हणणं चुकीचं होतं कारण प्रत्येक क्षणी तो तिच्या बरोबर होता. त्याचं रुबाबदार दिसणं, त्याची हुशारी, त्याचं witty असणं सगळंच तिला आवडत होतं. हे नक्की काय आहे हे कसं process करावं तिला काही झेपत नव्हतं . Maths चं पुस्तक काढलं तरी तोच आठवतो जाऊ दे मी ना जरा मराठी च वाचते असं ठरवून तिने पुस्तक काढायच्या ऐवजी वही काढली आणि तिच्या ही नकळत तिच्या हातून ओळी बाहेर पडल्या

गळ्यात खूप काही दाटून आलं होतं
ओठांना खूप काही सांगायचं होतं
पण शब्द ओठांना फितूर झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
डोळ्यात खूप काही दाटून आलं होतं
डोळ्याना खूप काही सांगायचं होतं
पण  अश्रू डोळ्याना फितूर झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
कधीतरी डोळ्यांना आणि ओठांना मिळेल साथ
आणि मनात आलेलं सगळ सांगून टाकेन तुझ्या साठी खास

आज पर्यत प्राचीने फक्त दिलेल्या विषयावर अभ्यास करून विचार करून लिहिलं  होतं हे असं काहीतरी प्रथमच तिच्या मनातून बाहेर पडलं होतं. हे काय सगळं लिहिलं आपण ? कोणामुळे? कशामुळे ?

प्राची बंद कर टी वही आणि चुपचाप अभ्यास कर . सगळं मनातून बाहेर काढ

निरुपा - "विवेक चल जेवायला. काय चाललंय रूम मध्ये ?"

प्राचीचे बाबा  - "प्राची चल जेवायला. नंतर कर राहिलेला अभ्यास "

विवेकने गिटार कडे एकदा पाहिलं. विवेकने ठेवली

प्राचीने कवितेकडे एकदा पाहिलं वही बंद केली

दोघांनी एकाच वेळी खोलीतले दिवे  बंद केले एक सुस्कारा टाकला आणि जेवायला गेले

 

 

 

गुरुवार, १३ जुलै, २०२३

पहिली Ride

 


माधुरीने दिलेला डबा परत करायला विवेक घरी आला.

विवेक - "काकू , काकू "

माधुरी काहीच बोलायला तयार नाही .

विवेक परत जोरात ओरडला - "काकू , अहो काकू. आईने हा डबा परत दिला आहे "

काहीच उत्तर नाही बघून विवेक चक्रावला.

तेवढ्यात प्राची बाहेर आली.

प्राची –“Hi Vivek. Aai is observing silence today. तिच्या meditation मधला एक भाग आहे हा”

विवेक - "That’s what I was wondering. आणि हो हे तुझं पुस्तक पण परत करायचं होतं.

प्राची –“ काय रे इथल्या इथे यायला तू Goggle, shoes etc. घालून आला आहेस!”

विवेक - "No I am going in a library. I need to check few books”

प्राची –“ अरे माझ्याकडचं कोणतं हवं आहे का?”

विवेक मिश्किल हसत म्हणाला - " मला जे हवंय ते तुझ्याकडे नाही”

प्राची जरा घुश्यात म्हणाली –“What do you mean?”

विवेक –“chill, I need to check engineering books बाई”

प्राची –“Oh!! काय रे तू पण!!”

विवेक –“ जरा गम्मत ग! येतेस का तू पण ? पटकन bike वर जाऊन येऊ”

प्राची –“ अरे अभ्यास करते आहे, next time?”

विवेक –“ चल ग पटकन येऊ”

विवेक  बरोबर  bike ride! Woow प्राची मजा आहे तुझी असं टी स्वतः च स्वतः ला म्हणाली आणि खुश झाली . आईच्या मौन व्रताचा फायदा आहे की आज. आई मी आले ग पटकन असं म्हणून ती चपला अडकवून बाहेर पण पडली

प्राची –“Opps Vivek, I didn’t change. Give me 5min please?”

विवेक –“ अग मस्त दिसते आहेस तू जशी आहेस तशी खरंच . कशाला change करायचं ? तू जर तयार होऊन आलीस तर मला complex येईल”

प्राची –“ काहीही हा.”

आणि मनात म्हणाली  तू केवढा handsome आहेस ते फक्त मलाच माहीत आहे की काय!”

विवेकने bike ला kick मारली. प्राची मागे बसली. वाऱ्याने तिचे केस उडत होते. विवेक ला ते समोरच्या आरशातून दिसत होते.

विवेक मनात म्हणाला – “Doesn’t she know she is so simple and yet beautiful”

Library च्या parking मध्ये bike park करून दोघे पहिल्या मजल्यावर गेले. Engineering section मध्ये जाऊन विवेकने थोडा शोध घेतला पण त्याला हवं ते पुस्तक तिथे नव्हतं.

विवेक –“ प्राची चल जाऊ या नाही मला हवं ते इथे पण”

प्राची मागे वळली. विवेकच्या काळ जात एक कळ उठली . “Shit I have a crush on her”

प्राची –“ ठीक आहे चल मग” उदास होऊन प्राची म्हणाली

विवेक –“ अगं तू का उदास होते आहेस . इथे नाही मिळालं पुस्तक दुसरीकडे मिळेल”

प्राची –“ नाही रे आता लगेच घरी जावं लागेल ना”

गालातल्या  गालात हसत विवेक म्हणला-“ पण कोणाला तरी खूप अभ्यास आहे ना. कोणीतरी तयार पण नव्हतं यायला”

बापरे याला कळलं का प्राची बावरली

प्राची –“ अरे इथे जवळ एक lake आहे. एक छोटी चक्कर मारू या का?”

विवेक –“ वा वा का नाही ? मला पण जरा इथल्या जागा कळतील”

Parking मधून bike काढून प्राची सांगेल त्या दिशेने विवेकने गाडी वळवली.

५ मिनट त ते दोघे lake वर पोचले पण

विवेक –“ अग काय सुन्दर जागा आहे ग ! बसू या इथे ५-१०मिनट?”

प्राची मानेनेच हो म्हणाली. ते अत्यन्त मूक होऊन पाण्यावरचे  विरत जाणारे तरंग कितीतरी वेळ बघत बसले.

अस्ताला जाणारा सूर्य बघून विवेक हळूच म्हणाला चल निघू या

प्राची मानेनेच हो म्हणाली.

पहिल्या ride हुन परत येताना दोघेही मूक होते.

प्राची च्या घरासमोर गाडी थांबली.

विवेक –“ अशा सुंदर संध्याकाळी परत मिळोत Bye.”

प्राची-“ इतक्या सुंदर ride बद्दल खूप thank you. This was my first ever ride and it was so memorable”