सोमवार, ३० मे, २०११

तुझ्यासाठी

गळ्यात खूप काही दाटून आलं होतं
ओठांना खूप काही सांगायचं होतं
पण शब्द ओठांना फितूर झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
डोळ्यात खूप काही दाटून आलं होतं
डोळ्याना खूप काही सांगायचं होतं
पण  अश्रू डोळ्याना फितूर झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
कधीतरी डोळ्यांना आणि ओठांना मिळेल साथ
आणि मनात आलेलं सगळ सांगून टाकेन तुझ्या साठी खास

कोपरा

प्रत्येकाच्या मनात एक  कोपरा असतो. काळ, वेळ, स्थळ या कशाचाच त्याला बंधन नसत. कधी वाटेल तेव्हा त्या कोपरयात जाउन बसावं. कधी तिथून दिसतो अथांग सागर, कधी दिसतात ताडामाडाची झाडं.
कधी दिसते प्रिय व्यक्ती तर कधी दिसतात स्वतःची ध्येयं. कधी दिसते स्वतःची जन्मभूमी, तर कधी दिसते स्वतःची स्वप्नभूमी. बालपणीच्या आठवणी तिथे  जागतात, भविष्यकाळाची स्वप्न तिथे दिसतात. प्रत्यक्षात न करता येणारया गोष्टी आपण तिथे  बसून नक्की करू शकतो. प्रत्यक्षात न भेटणार्या व्यक्ती तिथे  येतात आपल्याशी गप्पा मारतात. कधी खूप एकट वाटत असेल कधी कोणाची आठवण येत असेल तर थोडा वेळ काढावा, आपल्या मनाचा कोपरा गाठावा, वाट्टेल ते करावं,स्वतःला झोकून द्याव. मन भरलं किंवा ताळ्यावर आलं की परतावं.

रविवार, २९ मे, २०११

सय

सय येते सख्या तुझी आठवणीच्या गाभारात
मंद नंददिपासमे तेवे माझिया मनात
सय येते शब्दासमवे बोलते मनात
कविता बनून भरारी घेते मोकळ्या नभात
सय होते दुख ओघळते नयनात
सय होते सुख हासते ओठात
सय होते साठवण दाटते मनात
शब्द बनून नटून  येते कवितेच्या पानात

गुरुवार, २६ मे, २०११

पहिला पाउस

पहिल्या पावसाशी प्रत्येकाचा एक नात असतं.कधी व्यक्त असत तर कधी अव्यक्त.पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर दुख वाहून जातं.पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर सुख हसत येतं.  कोमेजणार्या फुलांना जगण्याची नवी आशा मिळते. वठलेल्या झाडाला नवी पालवी फुटते. मग माणसाला नवी उमेद का निर्माण  होऊ नये? दुख झटकून मोकळ व्हावं, हसत हसत पहिली सर अंगावर घ्यावी, पहिलं प्रेम आठवावं, आलं घातलेला मस्त चहाचा कप हातात घ्यावा, आतआणि बाहेर पाउस कोसळू द्यावा. पाउस थाबल्यानंतर स्वच्छ मनानं नव्या गोष्टीना सामोर जाव. जगणं सुंदर आहे. जगणं पाउस आहे. जगणं कोसळत्या सरी आहे.
नात्यास अपुल्या नको नाव देऊ
ते आहे जगावेगळे
प्रेमाची उधळण करूनही
बंदिस्त अपुले जगणे

एकमेकांच्या हातात हात गुंफुनी
क्षितीजाशी जाणे मनी
नजरेला नजर मिळणेही
होते दुर्मिळ क्षणी

धुक्यातून वाट शोधत
पोहोचायचं असतं एकमेकांपर्यंत
भावपूर्ण भेटींचे क्षण बाळगायचे असतात उरापर्यंत

प्रत्येक क्षणात असतो
एकमेकांच्या असतित्वाचा साक्षात्कार
वेगवेगळ जगतानाही नसतो आपपरभाव
जमत आता मलाही
एकट एकट रहाणं
एकट जगत असतानाही
तुझ्या आठवणीत रमणं
तुझ्या आठवणीचा
आता त्रास होत नाही
तुझ्या आठवणीमुळए
आता दुख होत नाही
मिळतो एक सुखद आधार
चांगल्या क्षणांचा
बळ देतात मला त्या एकट जगायला
जमत आता मलाही
एकट एकट रहाणं
एकट जगत असतानाही
तुझ्या आठवणीत रमणं
तुझ्या आठवणीचा
आता त्रास होत नाही
तुझ्या आठवणीमुळए
आता दुख होत नाही
मिळतो एक सुखद आधार
चांगल्या क्षणांचा
बळ देतात मला त्या एकट जगायला