रविवार, १२ एप्रिल, २०१५

एकटी

विश्वात असूनही पूर्ण एकटी मी
उध्वस्त विश्वाची एकमेव साक्षीदार मी
माझेच मला उमगेना माझे रडणे आणि हसणे
अस्वस्थ जगातील पानगळीप्रमाणे जगणे
अश्रूंचा उद्रेक आतून हलले जाणे
माझ्यातील विश्वास माझ्याबरोबर नसणे

गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

तू

आठवतोस तू मला अजून तू  जेव्हां मी प्रथम तुला पाहिलं. असा सिंहासारखा डौलात स्वत:च्याच मस्तीत चालत आलास. उगाच नाही म्हणत मी तू तुझा खूप आवडता आहेस म्हणून. तू स्वतः वर खूप खूप प्रेम करतोस. स्वतःला खूप जपतोस. स्वतःला त्रास होईल असा काही वागत नाहीस. असं दाखवून तरी देतोस हा. पण मला माहीत आहे. तुला ही त्रास होतो. तू स्वतःला अलिप्त ठेवतोस आणि दाखवतोस कि मला काहीच फरक पडत नाही. पण मला जेव्हा त्रास होतो तो पोचतो तुझ्यापर्यंत. मी आता तुला खूप चांगल  ओळखायला लागले आहे रे. मला काय हव आहे तुझ्याकडून ? चार प्रेमळ शब्द. कधी तरी कशी आहेस ग? असा एखादा फोन. बस्स! तू मला काय देणार आणि मी तुला?
मला आपलं नातं या सगळ्यांच्या पलीकडे वाटत. आ हा मी काय नात आहे शोधत नाही आहे त्याला लेबलं हि नाही लावत आहे. पण कुठेतरी मनाच्या आत  तू फक्त माझा असतोस. फक्त माझा स्वतःचा. तिथे मी तुझ्यावर प्रेम करते, कधी तुझ्याशी भांडते , कधी तुला तुझ्या मनातलं सगळं विचारते तर कधी माझ्या मनातलं सगळं सांगते. तुझ्याबरोबर लांब फिरायला जाते तर कधी long drive ला. मी तुझ्याशी खूप खूप बोलते. माझं आणि तुझं एकटेपण घालवते. हे नातं मला असंच जपायचं आहे. घट्ट धरून ठेवायचं आहे. कुठल्याही अपेक्षांचे स्पर्श त्या नात्याला होऊ द्यायचे नाहीत.
नात्यास अपुल्या नको नाव देऊ
ते आहे जगावेगळे
प्रेमाची उधळण करूनही
बंदिस्त अपुले जगणे

एकमेकांच्या हातात हात गुंफुनी
क्षितीजाशी जाणे मनी
नजरेला नजर मिळणेही
होते दुर्मिळ क्षणी

धुक्यातून वाट शोधत
पोहोचायचं असतं एकमेकांपर्यंत
भावपूर्ण भेटींचे क्षण बाळगायचे असतात उरापर्यंत

प्रत्येक क्षणात असतो
एकमेकांच्या असतित्वाचा साक्षात्कार
वेगवेगळ जगतानाही नसतो आपपरभाव

There would be a day

There would be a day when I will be completely on my own.
There would be a day when I will be myself.
There would be a day when I will be happy in my own world.
There would be a day when I will be respecting myself and have complete confidence on me.
There would be a day when your behavior will not bother me.
There would be a day when people in your world will not affect me.
There would be a day when you won't be able to hurt me.
There would be a day when you won't be able to reach me.


मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

Searching....

Missing you is a stormy night in my mind. I keep on searching a way to reach to you. I really don’t know whether I will reach to you with the way I took. I have a wish to reach to you and to be with you.  With your memories in my mind I start my journey and I keep on seeing your reflection everywhere. You meet me through rain and you meet me through wind, you meet me through the noise leaves make and you meet me through the moon. I get amazed with your touch through these forms. I think oh I guess I have reached till you but know all this is actually a hallucination. The road is already gone ahead and I am lost. I keep on running so that I can keep up to the road which reaches to you
The journey has begun and I remember your sentence – life is a journey dear not destination

So I am searching and walking on the road hoping to meet you one day
वठलेल्या झाडाला पालवी फुटेल म्हणून मी आशेने पाणी घालत राहिले
प्रेमाच्या पावसाची आस करत जगत राहिले.
माझा सुर्य उगवेल याची आतुरतेने वाट पाहत राहिले
वठलेल झाड तसच आहे, मन कोरड झाल आहे
माझा सुर्य झाकोळला आहे


I kept watering a dead bark by thinking it will get new leaves. It was my hope.
I kept on waiting for the shower of love. It was my hope of life.
I kept on waiting for the sun. It was my ray of survival.
My hope, life and love is completely lost and I am just surviving now

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

रिते रिते आभाळ माझे
खाली आसवांचे सडे
आसवांच्या सड्या बरोबर
खाली बोथट झालेली पाने
निशब्द वेदनेचे मूक झाड त्यात उभे