मला लागलेली मीपणाची चाहूल खूप सुखावह आहे
मला कळलेली मी खूप सुंदर आहे
झुगारून देते मी तू मला दिलेला कमीपणा
आणि प्रेम करते मी माझ्यावर
हरवलेलं सगळ परत शोधायचं आहे
मला मी माझी समजून प्रेम करायचं आहे
मिळवायची आहे माझीच दाद
द्यायची आहे माझी मलाच शाबासकी
माझी सखी मीच आणि माझी प्रेमिका
माझी सर मीच आणि माझी झळाळी
हि पालवी मला उभारी देते आहे
हि कोवळी चाहूल माझ्या नव्या जगण्याची चाहूल देते आहे
मला कळलेली मी खूप सुंदर आहे
झुगारून देते मी तू मला दिलेला कमीपणा
आणि प्रेम करते मी माझ्यावर
हरवलेलं सगळ परत शोधायचं आहे
मला मी माझी समजून प्रेम करायचं आहे
मिळवायची आहे माझीच दाद
द्यायची आहे माझी मलाच शाबासकी
माझी सखी मीच आणि माझी प्रेमिका
माझी सर मीच आणि माझी झळाळी
हि पालवी मला उभारी देते आहे
हि कोवळी चाहूल माझ्या नव्या जगण्याची चाहूल देते आहे