windwhispers
गुरुवार, ३१ मार्च, २०१६
वेदनांचे झाड
जुन्या वेदनांचे नवे हे झाड
डवरून निघाले वसंतात
वेदनेची कोवळी पालवी
का बरे पुन:पुन्हा भूल पाडू लागली
उमाळे
जुन्या वेदनांचे नवे हे उमाळे
मुक्या संगतीने उशाशी मिळाले
तुला शोधताना मिळाल्या वेदना
तूच समजुनी मी त्याला बिलगले
कवेतल्या वेदनांनी तुझ्या सयी काढल्या
त्यासह मग मी रात्री जागवल्या
रविवार, ६ मार्च, २०१६
शांतिवन
शांत, निळे, अथांग, कोवळे पाणी
काठावर गातो ओदुंबर गाणी
ध्यानस्थ बसलेला बाक मधोमध जागी
श्वास निश्वासातील अंतर मुकेपणी मोजी
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)