गुरुवार, २६ मे, २०१६

मीपणा

मला लागलेली मीपणाची चाहूल खूप सुखावह आहे
मला कळलेली मी खूप सुंदर आहे
झुगारून देते मी तू मला दिलेला कमीपणा
आणि प्रेम करते मी माझ्यावर

हरवलेलं सगळ परत शोधायचं आहे
मला मी  माझी समजून प्रेम करायचं आहे
मिळवायची आहे माझीच दाद
द्यायची आहे माझी मलाच शाबासकी

माझी सखी मीच आणि माझी प्रेमिका
माझी सर मीच आणि माझी झळाळी
हि पालवी मला उभारी देते आहे
हि कोवळी  चाहूल माझ्या नव्या जगण्याची चाहूल देते आहे 

माझे क्षण

माझे क्षण होते भाळण्याचे, प्रेम करण्याचे
आणि आताचे सारे क्षण एकाकी रितेपणाचे
माझे क्षण एकाकी, कोणाची तरी वाट पाहणारे
अन
माझे क्षण मेघ झाले
माझे क्षण बरसून गेले
माझे क्षण झाले शांत रिते आभाळ
माझे क्षण फक्त माझेच राहिले

तुझे स्थान

शब्दाचे आभाळ माझे
चांदण्यांनी चमचमले
तुझे स्थान सख्या
ध्रुव ताऱ्याप्रमाणे अभंग राहिले 

मर्म

जगण्याच्या  माझे
इतकेच मर्म उरले
तू बरोबर नसतानाही
तुझ्याच  समवेत जगणे