बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

सहेला

 संध्याकाळच्या आधीची
आयुष्यातली कातरवेळ,,
नेहमीचा एकटेपणा
अजून जास्तच गहिरा गहिरा
आपण कोणीही नाही असं सतत वाटत असताना
अचानक सहेला अवतरला

तो नाही सारखा अवती भवती
पण तरीही मनात घर करून राहिलेला
अगदी सख्खा सहेला
तो नाही रोज भेटणारा
पण प्रत्येक क्षणी मनात वावरणारा
तो नाही नवरा किंवा प्रियकर
पण या सगळ्या बिरुदांच्या पलीकडे असलेला
कसलं ही मापदंड न लावता
प्रेम करणारा
माझ्या मनातला सहेला