एक झरा वाहत असतो आत खोलवर
खूप जास्त प्रेम द्यायचं असतं कोणाला तरी
कधीच का बरं मला
त्यावेळी स्वतः ची आठवण होत नाही ?
सतत भरभरून द्यायचं असतं दुसऱ्याना
कधीच स्वतः ही काही तरी घ्यावं
असं का नाही वाटत मला ?
खूप जास्त काही तरी करायचं असतं कोणासाठी तरी
स्वतःला छान वाटेल असं काही तरी करावं
असं का नाही वाटत कधीच?