शुक्रवार, ५ मे, २०२३

गलियाँ

 

हम आपकी गलियोंसे गुजर रहे है

ये रास्ते इससे पहले इतने हसीन नहीं लगे है

रस्ते

 

तुझ्याकडे येणारे सगळे रस्ते

अतिशय सुंदर होत चालले आहेत

इथली वळणं, इथल्या वाटा

खरं तर कधीच नवीन नव्हत्या

पण ते अचानक नवीन वेगळे वाटायला

लागले आहेत

ते रस्ते, ती वळणं आणि त्या वाटा सुंदर झालया आहेत

कारण ते सगळे तुझ्यापाशी येऊन पोचतात

सोमवार, १ मे, २०२३

मूक

 मुक्या जीवाचे मुकेच मंथन
मुक्या मनातले मुकेच अंतर
किती बोल ते राहून गेले
तुझ्या जाण्याबरोबर
बोलते झाले