आज तुझा वाढदिवस. सलग नऊ वर्षे मी तुझ्याशिवाय तुझा वाढदिवस साजरा करते मनांतल्या मनात. शेवटचा एकत्र साजरा केलेला वाढदिवस लक्षात राहावा म्हणून कदाचित मी तुला
surprise भेट दिली असेल. एरवी ते तुला आवडायचं नाही पण तुला पाहिजे होत तेच दिल्यामुळे तू खुश झालास. तोच झब्बा आता मी किती तरी वेळा घालते ते क्षण परत परत आठवण्यासाठी.आपल्या सहवासाच्या सोनेरी क्षणांची आठवण किती तरी वेळा मनात दाटते आणि मग मी सैरभैर होऊन जाते. तुझं माझं नातं कुठल्याही शब्दांच्या पलिकडचं आहे. ते काळाबरोबर माझ्यापासून दूर गेलेलं असलं तरी ते घालवलेले सगळे क्षण मला जसेच्या तसे लख्ख आठवतात अगदी कालच घडल्यासारखे. तू आता कुठे आहेस, तुला आम्ही दिसतो का? लोक जातात म्हणजे कुठे जातात मला माहित नाही पण मला माझ्यामध्ये तुझ अस्तित्व जाणवत. आणि म्हणूनच तुझा वाढदिवस साजरा करते मी मनांतल्या मनात. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदाने रहावास. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही त्यामुळे आपण कधी कुठे परत भेटू का मला माहित नाही. तुझ्या बरोबर घालवलेले सगळे क्षण मात्र मी जाईपर्यंत माझ्याबरोबर रहातील.