मंगळवार, २८ जून, २०११

काही क्षणी

काही क्षण असतात
खूप हळवे
मोती विखुरतात चहूकडे
मोती गोळा करायला नाही रे
मी भरलेले मोती
थोडा वेळ ओजंळीत धरणारे

काही क्षण असतात
खूप फसवे
नभ भरून पाऊस आणणारे
पावसात भिजायला नाही रे
मी भिजल्यावर
मला थोड कोरड करणारे

काही क्षण असतात
खूप रिक्त एकटे
सतत माझ्याबरोबर नाही रे
थोडा वेळ मला साथ देणारे

होशील का रे तू माझे हे सगळे क्षण?
वाटत हवास तू जवळ
प्रत्येक क्षणी नाही रे काही क्षणी 



शनिवार, २५ जून, २०११

श्वास

माझे श्वास नेहमीच असतात
तुझ्या श्वासांसाठी आतुर
दोन   श्वासांमधलं अंतर काप्तानाही
मना होत काहूर

शब्द

माझ्या अनेक शब्दांमधून
तुला खूप काही सांगायचं असतं
तू वाचत असताना तुला समजलं
का ते हळूच पहायचं असत

तूपण

तुझ्याबरोबर  रहायचं असताना
तुझ्यापासून दूर जावं लागत
तू नाहीस म्हणून
तुझ्या आठवणींवर
रहायला लागत
तुझ्या आठवणी
तुझा श्वास देतात
तुझ्या आठवणी
तुझा स्पर्श देतात
तुझ्या आठवणी
मला तुझं
तूपण देतात

मंगळवार, २१ जून, २०११

तुझीच

क्षण कोवळे  थेंब दवाचे
पानावरती सजून आले
क्षण हसरे बनुनी सूर्यकिरण ते
प्रभाती तव भेटीस आले
क्षण उल्हासले तुझ्या कटाक्षाने
सोनेरी बनून परत आले
क्षण हळवे थेंब पावसाचे
सरीवर सरीने कोसळत राहिले
थेंब चंदेरी चंद्रप्रकाशाने
न्हाउनी तव भेटीस आले
गात्रागात्रामध्ये तुज साठवून
परत माझ्या उशाशी आले
हे सारे क्षण अंतरी साठवून
हे सारे क्षण अंतरी साठवून
मी तुझीच रे तुझीच झाले

गुरुवार, १६ जून, २०११

तुझी आठवण

तुझी आठवण होणं
हे मुक्त होणं आहे
तुझी आठवण येणं
हे व्यक्त होणं आहे
तुझी आठवण हि
अंतरातील साठवण आहे
तुझी आठवण हे
हृदयाचं कंपन आहे.
तुझी आठवण तुझं जतन आहे
तुझी आठवण माझं मी पण आहे.

मन

कागदावर लिहिलेलं झरझर
पटपट माझ्या मनात शिरलं
कागद झाला कोरडा
माझं मन मात्र शब्दाने  भरलं

मी

असंच रहाव मी
अलगद पिसासारख
यावं तुझ्या मनात
आठवणीसारख
तुला नाहीच कळणार मग
तू कधी माझा झालास आणि
मी कधी तुझी झाले

इथे

इथे कोणीच नसते कोणाचे
प्रत्येक असते  एकटे
तरीही जगण्याचे अर्थ मात्र
प्रत्येकाचे वेगवेगळे
इथे प्रत्येकाच्या मनात
असते खोलवर दडलेले
तरीही व्यक्त होणे मात्र
प्रत्येकाचे वेगवेगळे

बुधवार, १५ जून, २०११

तुझ्या बरोबर असणं

तुझ्या बरोबर असणं म्हणजे शरदाच चांदणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे मोत्याच सांडणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे मोगरयाचं हासणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे दवाच शिंपणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे पहिल्या पावसात भिजणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे माझं तुझ्यात मिसळणं

मंगळवार, ७ जून, २०११

नातं

नातं  कधी असतं गहिर अथांग खोलवर नेणारं,  कधी असतं रेशमी वस्त्रासारख. कधी खूप अपेक्षापूर्ण तर कधी नीरपेक्ष.
कोण किती जवळचं आहे हे असं मोजपट्टी लावून नाही ठरवता येत. नातं कधी ठरवून जोडता नाही येत ते आपोआप घडत.
नात्याला लेबल नसतं आणि तरीही प्रत्येक नातं स्पेशल आणि जवळच असतं.

जवळ

तुझं जवळ वाटणं
सुखावह असतं
तुझं जवळ असणं
स्व्प्नदायी असतं

तू

कशा सांगू तुला माझ्या भावना
कळतील तुला त्या न सांगता?
कशा सांगू तुला तुझ्या नसण्याच्या खुणा
किती त्रास देतात मला ?