मंगळवार, २१ जून, २०११

तुझीच

क्षण कोवळे  थेंब दवाचे
पानावरती सजून आले
क्षण हसरे बनुनी सूर्यकिरण ते
प्रभाती तव भेटीस आले
क्षण उल्हासले तुझ्या कटाक्षाने
सोनेरी बनून परत आले
क्षण हळवे थेंब पावसाचे
सरीवर सरीने कोसळत राहिले
थेंब चंदेरी चंद्रप्रकाशाने
न्हाउनी तव भेटीस आले
गात्रागात्रामध्ये तुज साठवून
परत माझ्या उशाशी आले
हे सारे क्षण अंतरी साठवून
हे सारे क्षण अंतरी साठवून
मी तुझीच रे तुझीच झाले

1 टिप्पणी:

  1. अरेच्या पुण्यात पाऊस पडला वाटत !! पण परत ....हे सगळ छान छान सुचत कस काय ? मला हे अस वाटत...मुंबईच्या पावसात

    आकाशी ढग आले काळे दाटून
    रस्तोरस्ती माणसे कचेऱ्या फुटून
    आकाशाच्या धनुष्यातून सुटले थेंबांचे बाण
    भिजली माझी वस्त्रे फाटली वहाण...
    दूर थांब्यावर मला ती भिजताना दिसली
    मी तिच्यापर्यंत जाईपर्यंत निसटली
    आता कधी दिसणार देव जाणे
    निदान पावसात तरी तिने असेच निघून जाणे ?
    मुळात ती दिसणे काय सोप आहे?
    तासन् तास तिच्यासाठी थांबण रोजचच आहे !!
    आज तरी तिने थांबायला हव होत
    जाता जाता मला सोबत घ्यायला हव होता
    ती रहदारी मध्ये तर अडकणार नाही ?
    साठलेल्या पाण्यात तर बुडणार नाही?
    मी धापा टाकत काळजी करत थांब्यापाशी येतो
    समोर उभ्या माणसाला वेड्या सारखा विचारतो
    आत्ता गेलेली परत का हो येते ?
    तो म्हणतो घाबरू नका
    स्टेशन ची बस दर चाळीस मिनिटानीच येते ............

    उत्तर द्याहटवा