आनंददायी प्रवास तुझ्याबरोबरचा माझा
एकत्र चालण्याचा हा अनोखा अनुभव तो आला
मन रिते शब्द रिते रिते अंतर माझे
तुझ्या सोबतीने सख्या आनंदाचे झाड झाले
झाडाला त्या मग कळ्या खूप आल्या
सुगंध सहवासाचा चहूकडे पसरला
मना सुगंधी तन सुगंधी श्वास सुगंधी झाला
तुझा सहवास मग चहूकडे दरवळला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा