प्रत्येक माणसाबरोबर समांतर आयुष्य जगावं म्हणजे मग कुठेही धोका नाही रस्ता वळणाचा होण्याचा. त्या वाटांमध्ये हरवण्याचा. नागमोडी वळण फार त्रास देतात.
ज्यांना आयुष्यात थ्रील आवडत, ते म्हणतील चे हे कसल आयुष्यं! पण ज्याने आयुष्यात खूप धोके पचवले असतात ती व्यक्ती असच म्हणेल कि समांतर आयुष्यच बर बुवा.
ज्यांना आयुष्यात थ्रील आवडत, ते म्हणतील चे हे कसल आयुष्यं! पण ज्याने आयुष्यात खूप धोके पचवले असतात ती व्यक्ती असच म्हणेल कि समांतर आयुष्यच बर बुवा.
काही धक्के आपल्याला समांतर वागवणयाकडे नेतात खरे ... पण ते उत्तर नाही एवढ नक्की
उत्तर द्याहटवाआपल्यालाच गंतव्य माहित नसल की हरवायला होत!!
समांतर नव्हते; म्हणून अर्जुनाला आप्तांना कस मारू हा प्रश्न पडला .. पण म्हणूनच गीता सांगितली गेली ...समांतरच असत तर गीता नसती सांगितली गेली ! आणि समांतर काही नसत म्हणून "यथा काष्टंच काष्टंच" सांगितल गेल गीतेत! तस पाहिल तर प्रत्येक आयुष्यच समांतरच ..पण प्रवाहात एकत्र येण होत...
समांतर नव्हते म्हणून रावणाने सीतेला पळवली ... म्हणून रामायण घडले ... पण समांतर रामाने मात्र नंतर सीतेला गरोदर असताना सोडून दिली ..(रावणाने नक्की कपाळावर हात मारला असणार स्वर्गात ..म्हणाला असेल "मी काय वेगळ सांगत होतो? मी राणी सारखी सांभाळणार होतो ; सोडून द्यायच होत, तर मला कशाला मारल ?..असो") तरीही राम मर्यादा पुरुषोत्तम (आपल्या संस्कृती मध्ये "उत्तम पुरुषानेच" बायकोला अशी सोडली, उगाच गर्भपात वाल्यांना मुली मारतात म्हणून पकडतात ... )? समांतर नक्कीच सगळ्याच उत्तर नाही.
समांतर म्हणजे "न भेटणारे" म्हणायचं आहे का? पण खरच भूमिती पलीकडे समांतरला किती अर्थ आहे?
रस्ते ज्यावेळी नागमोडी होतात तेव्हा किंवा एकमेकांना भेटतात तेव्हा चालणारा ठरवतो दिशा कुठली... कधी चूक कधी बरोबर .. त्यात चूक बरोबर काही नाही
भूमितीत सुद्धा "न भेटणाऱ्या" पण समांतर नसलेल्या रेषा असतात; "skew" म्हणतात त्यांना ..लोकांना वाटत त्या भिडल्या पण ..प्रत्यक्षात भेटतच नाहीत ..
आगगाडीचे समांतर रूळ सुद्धा क्षितिजात एकमेकांना भिडतात .. क्षितीज तर जमीन आणि आकाशाला सुद्धा समांतर ठेवत नाही ... आपली काय बात?
आपली क्षितीज मात्र आपली आपल्याला ठरवावी लागतात ..मग कशाचाच भय नाही!!