संध्याकाळची हलकीशी तिरीप दाराशी आली आणि तिला कळल संध्याकाळ हळूहळू येते आहे दाराशी. दिवस संपत आला. हलकेच उठून झोक्यावर बसत तिने खिडकीच्या बाहेर पाहिलं, हलक उन आणि सुर्यास्तामुळे झाड पण वेगळीच भासत होती. तिने पटकन स्वतःसाठी चहाच आधण चढवल, आलं किसून टाकल आणि चहा उकळेपर्यंत स्वयंपाकघराच्या खिडकीतून पक्ष्यांची लगबग ऐकत राहिली. मस्त वाफाळणारा चहा कपात ओतून तिने पटकन दार उघडले आणि समोरच्या पायरीवर आपली बैठक जमवली. तिचा हा रोजचा आवडता उद्योग. दिवसभर थकलेल्या या पक्षी, झाड, वेली यांबरोबर सूर्यास्त अनुभवण हि कशी वेगळी मजा आहे हे त्यान तिला शिकवलं. घरासमोरच अंगण एकदम वेगळच भासायला लागत. अनेक पक्ष्यांचे येणारे वेगवेगळे आवाज, त्यांना साथ देणारी पानांची सळसळ, या सगळ्यात कधी तरी मध्येच येणारी निस्तब्ध्ता आणि अशा वेळेला जाणवणारी फक्त वारयाची झुळूक. त्या बरोबर येणारा असंख्य फुलांचा घमघमात. स्वतःसाठी तो असा खूप वेळा वेळ शोधून काढायचा आणि असे छोटे छोटे क्षण तिच्याबरोबर उत्कटपणे घालवायचा. असा सूर्यास्त बघायला मग शब्द लागायचे नाहीत. एकमेकांबरोबर अस अनुभवण हा च एक सोहळा होऊन जायचा. तिला आठवला त्याचा फोटो पाठून काढलेला - प्रकाशाच्या समोर उभा असलेला ..किती छान दिसतो हा असा. मावळत्या सूर्याला सलामी देत असतानाचा.
त्याच्यावर आपलं अजून पण तेवढच प्रेम आहे. तोच तर येतो भेटीला या प्रत्येक संध्याकालेतून. या जाणीवेने ती मोहरून गेली. त्यची अशी नव्याने झालेली ओळख तिला आवडली.
त्याच्यावर आपलं अजून पण तेवढच प्रेम आहे. तोच तर येतो भेटीला या प्रत्येक संध्याकालेतून. या जाणीवेने ती मोहरून गेली. त्यची अशी नव्याने झालेली ओळख तिला आवडली.