डोळ्यांच्या पापण्या मिटल्या आणि आठवणी डोळ्यात साठल्या. ह्रिदयाचा कप्पा उघडून आणखी आठवणी बाहेर पडल्या. त्यांचा एकमेकांशी संवाद होऊ लागला. अशावेळी माझी हि झोप उडून जाते आणि मग मी हि त्या आठवणीशी अजून संवाद साधते. मन हि मग काबूत रहात नाही. कधी हि आठवण उलगड तर कधी त्या आठवणीच्या खोलात शीर अस काहीतरी चालू होत. सगळ्या शरीराचा आणि मनाचा झोपेसाठी झगडा चालू होतो. आठवणीचे कसले कसले संदर्भ आठवायला लागतात. काही आठवणी स्पर्श करून ओलचिंब करतात तर काही थोड्या दुरून च लांब निघून जातात. त्यानाही तुझ्या सारखीच माझ्या जवळ येऊन गुंतून पडायची भीती वाटते बहुदा. काही आठवणी जणू पद्मासन घालून ध्यानालाच बसतात. तर काही आठवणी हलक्या हलक्या लांब निघून जातात. तुझ्या कुठल्याच आठवणी कधीच कुठेच जात नाहीत. त्या सगळ्या माझ्या नसानसात भिनल्या आहेत. त्या वेगळ्या आठवत नाहीत त्या सतत माझ्या आजूबाजूला रुंजी घालत असतात. तुझा रहाण आणि भेटण भलेही तात्पुरत होत तुझ्यासाठी, पण माझ्या साठी ती खूप मोठी ठेव आहे. खूप मौल्यवान आहे ते सगळ माझ्यासाठी. माणसाला मोह सुटत नाही म्हणतात तस मला अजूनही तुला भेटावस वाटत आणखी थोड्या आठवणी ओंजळीत भरून घ्याव्याश्या वाटतात. त्यांचा सुगंध नसानसात भरून तृप्त व्हाव असही वाटत. पण भेटत नसल्यामुळे जी अनामिक हुरहूर दाटते ती तुझ्या आठवणींच्या मात्र अजून जवळ नेते हे खर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा