सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

माणस

आधी लिहिलेलं तिचंच वाक्य तिने अनेक वर्षांनी वाचल  'तिला वाटल आपण फक्त आयुष्यातले टप्पेच जपून ठेवले आहेत.' कुठल्या विचारांमध्ये हे वाक्य लिहिलेलं असावं काय माहित? हो आपलं आयुष्य कसं असावं, आपल्या आयुष्यात काय असावं आणि काय असू नये याचा तिने कधीच विचार केला नव्हता, हे खर आहे. कदाचित टप्पे हि लक्षात ठेवले असतील पण तिचा लढा हा सर्वस्वी तिचा होता. तो तिची तिच लढली. तिच्या priorities तिने नीट समजावून घेतल्या. अनेक टप्प्यांवर अनेक माणसे सोडून गेली ती माणस आपण नाही विसरलो. खर तर या माणसांच्या सहवासातून आपण अजून घडलो, उमललो, फुललो, बहरलो हे तिला कळल आणि इतक्या वर्षांनीही तिला इतका आनंद झाला.
प्रत्येक प्रसंगाला कणखरपणे सामोरी जा हे सांगणारे तिचे वडील, हे संगव्णती आई, कर्तुत्वाचा मोठा आलेख पुढे ठेवणारा तिचा भाऊ, तिला उत्तमोत्तम वाचायला देणारी तिची बहिण. कला संगीत साहित्य यांची आवड न्क्लत्प्ने जोपासणार्या तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्यामुळे घडत गेलेली ती, उत्तम संस्कार करणारे तिचे शिक्षक, कवितेची ओळख घडवून देणारा आणि तिच्या प्रत्येक पहिल्या कवितेचा वाचक असलेला तिचा मित्र, मुलगा देखणा असू शकतो आणि त्याच्याकडे कसं आकर्षित व्हायचं हे सांगणारा तिचा प्रियकर, शिक्षणात रस घेऊनही बाकीच्या अनेक गोष्टी करत शिक्षण संपवणारे तिचे अनेक मित्रमैत्रिणी, उत्तम करिअर करत बाकीच्या आवडी सहजतेने जपणारा काही प्रसंगी हळूवार तर काही प्रसंगी चिडणारा तिचा नवरा. तिला तिची जागा योग्यपणे दाखवून कुठे मार्गक्रमण करावी हे शिकवणारा तिचा गुरु. तिला काय संज्ञाच आहे ते न सांगताच समजणारी तिची मैत्रीण . काय काय वाचावं,  काय काय  एऐकाव आणि काय काय टिपाव हे सांगणारे तिचे मित्रमैत्रिणी, भाऊ सखे आणि जिवलग. परिस्थितीवर मात करून आयुष्य सहजतेन जगायला शिकवणारी सासू. असे कितीतरी लोकं ज्यांच्यामुळे ती घडली, फुलली आणि फुलात राहिली. नुसते टप्पे नाही तर हि माणसहि आपण लक्षात ठेवली आहेतच की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा