सोमवार, २६ डिसेंबर, २०११

अस्तित्व

आयुष्यातले दिवसच्या दिवस रिकामे जातात. मी वाट पहात रहाते. कोणीतरी येईल, कोणीतरी फोन करेल, कोणीतरी माझ्या SMS ला उत्तर देईल. पण असं काहीच होत नाही. दिवस संपतो, संध्याकाळ होते. मनावर काजळी चढायला लागते, संध्याकाळ हळूहळू मनात शिरायला लागते. मन काहूरत. तुझ्याकडे सगळ ठीक असेल ना असं वाटायला लागतं. पण तुझ्याकडून उत्तराची वाट पहाण्यापलीकडे माझ्या काहीच हातात नसतं. कसं सांगू कसं असतं माझं हे एकटेपण? रितेपण सांगताना शब्द हि रिते होऊन जातात. उरतो मनात भावनांचा शून्यपणा, अंतरात एक खोल दाट पोकळी, आंतडयाच  पिळवटण आणि ह्रीदयाच मूक रडण. या सगळ्यांची समजूत घालता घालता मी थकून जाते. त्यांना सांगते मी शेवटी कि हे सगळं तू माझ्याबरोबर सतत असतोस म्हणूनच होत, तुझं माझ्यातलं जे अस्तित्व आहे त्याचच हे प्रकटीकरण आहे. या सगळ्यांची मी मग अश्रुनी समजूत घालते.एकटेपणाचच पांघरूण घेऊन रात्र हळूच मनात शिरते आणि या सगळ्यांना जोजवून झोपवते. तू उद्या नक्की येशील अस सांगितल्यावर ते सगळे शांत होतात आणि मग सकाळची स्वप्न मनात ठेवून तुझ्या आठवणींच्या कुशीत शिरून झोपून जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा