गुरुवार, ८ जून, २०२३

माझे बाबा

 

आपल्याला वाटतं असतं यांचं जाणं आपण स्वीकारलं आहे पण अचानक पावसाची सर कोसळावी तशी यांची आठवण येते आणि आपण सैरभैर होतो. सगळं बालपण समोर उभं ठाकत आणि काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशोब सुरु होतो. मग वाटतं कशाला हिशोब, नुसती यांची आठवण ठेवू या जवळ आणि जगू या आजचा दिवस. आली परत आठवण तर परत रडू, परत हसू. ते जसे अचानक गेले तसं कदाचित अचानक आपल्याही नकळत या जगातून exit घेऊ
पण तो पर्यंत हे शब्द जवळ ठेवू
ग्रीष्माच्या उन्हाळ्यात
तुमची आठवण आली बाबा खूप
आई गेल्यानंतर जेवढं पोरकं
नाही वाटलं तेवढं आता वाटलं
माझा बाप मला खूप पैसे नाही देऊ शकला
पण उदंड संस्कार देऊन गेला
त्याने मला लढायला शिकवलं
परिस्थितीबरोबर, लोकांबरोबर
पण स्वतःचं मी पण टिकवून
त्याने मला उभं रहायला शिकवलं
प्रसंगी परिस्थितीसमोर, लोकांसमोर वाकून
तो फारसा लढवया नव्हता पण
काय बरोबर काय चूक ते शिकून
वागणारा होता
तो फार प्रसिद्ध नव्हता पण
एक चांगला माणूस होता
मला एक चांगला माणूस बनवल्याबद्दल
बाबा तुमचे खूप आभार
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा