Swimming pool मध्ये तो शिरला आणि त्याने गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली “ओम नमस्ते गणपतये “,
"अरे च्यायला आली का ही मुलगी " अरे बाबा कर तुझ्या अथर्वशीर्ष वर concentrate. हा तर "त्वमेव प्रत्यक्षम"
"अरे आज हिने केसावर टोपी का बरं नाही घातली? छान सुन्दर आहेत हिचे केस. या केसांमधून हात फिरवता आला तर काय मज्जा येईल !! आणि हो आजचा हा निळा costume फारच छान दिसतो आहे हिला. येतेस का ग जरा जवळ छान वाटेल”
"त्वमेव केवलं कर्तासी” , “अग बाई एवढ्या जोरजोरात चालत येऊ नकोस माझ्यासमोरून , त्याहीपेक्षा जोरात मग माझं ह्रदय धावायला लागतं. नुसतं पायासाठी नाही ग मी तर माझा heart rate कमी असावा या करता पण येतो बाई इथे. जा लांब जा”
“काय हो आज तुमचा फोटो पहिला पेपर मध्ये छान वाटलं बघून”, “thank you madam येत असतात अधून मधून”
निळ्या costume वालीने बाईंना विचारलं “कोण आहेत हो हे”. हे ना खूप मोठे historian आहेत. एका मोठ्या insititute चे chairman आहेत हे”.
“अग बाई अशी का माझ्याकडे रोखून बघते आहेस ? तुला कळलं काय माझ्या मनात काय चाललं आहे ते ? मुलींना sixth sense असतो म्हणे. अग का मला एवढी निरखून बघते आहेस? तुला ही मी आवडलो का? बापरे हीचा session संपत आला तर का बरं ही परत माझ्या side ला येते आहे ? काय करावं आता? जाऊ दे जोरजोरात अथर्वशीर्ष च म्हणतो “त्वम साक्षात आत्मसि”
“Hello” निळा costume घातलेली सुन्दर केसांची मुलगी आपले डोळे मिचमिचत म्हणाली “Uncle you are so great!! You are a historian!! I am doing my major in history. Can you please teach me?”
तो उभ्या उभ्या गार झाला, “UNCLE”…. एकदम खिन्न आणि क्षीण स्वरात म्हणाला – “हो का नाही ? कधी चालू करू या ?”
“रोज इथेच या swimming pool मध्ये , याच वेळी चालेल का तुम्हाला? मी uncle म्हणू की sir?”
“Sir would be better” तो अगदी निराश होऊन म्हणाला.
“Ok sir see you tomorrow.”
Swimming
pool च्या बाहेर पडणाऱ्या तिच्याकडे शेवटपर्यंत
बघत त्याने परत एकदा पडलेल्या आवाजात अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात
केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा