प्रेमाच्या आठवणी
पहिल्या पावसासारख्या असतात
मृद्गंध देतात पण
मनाला पार भिजवून टाकतात
प्रेमाच्या आठवणी
वैशाखासारख्या असतात
आंब्याची पालवी, कैरीचा आंबटगोडपणा देतात
पण विरहाच्या वणव्याचा दाह देतात
प्रेमाच्या आठवणी
गुलाबी थंडीसारख्या असतात
दुलईची उब देतानाच
एकटेपणाची रुखरुख देतात
ऋतून्बरोबर प्रेम बदलत गेल तरी
आठवणी मात्र कायम जवळ असतात.
पहिल्या पावसासारख्या असतात
मृद्गंध देतात पण
मनाला पार भिजवून टाकतात
प्रेमाच्या आठवणी
वैशाखासारख्या असतात
आंब्याची पालवी, कैरीचा आंबटगोडपणा देतात
पण विरहाच्या वणव्याचा दाह देतात
प्रेमाच्या आठवणी
गुलाबी थंडीसारख्या असतात
दुलईची उब देतानाच
एकटेपणाची रुखरुख देतात
ऋतून्बरोबर प्रेम बदलत गेल तरी
आठवणी मात्र कायम जवळ असतात.
कुसुमाग्रज असते तर?
उत्तर द्याहटवाप्रेम आठवणींवर कराव आणि बदलणाऱ्या ऋतू वरही करावं
प्रेम कुणावरही करावं -