आठ एक दिवस गेले.
प्राची चा विवेक बरोबर
काही contact नव्हता. तिची सतत घालमेल व्हायची. याला एकदाही आपल्याला
contact करावा असं वाटत नसेल का?की मी त्याच्या दृष्टीने अजिबात च important नाही?
मुळात प्रश्न परत हाच येतो की मी त्याचा एवढा विचार करते च का आहे? शेवटी तिने फक्त
अभ्यासावर concentrate करण्याचं ठरवलं. गेला हा खड्ड्ड्यात जाऊ दे. एक सुंदर स्वप्न
संपलं आता जागं व्हायचं आणि फक्त आपल्या कामाला लागायचं बस्स.
प्राची
डोक्यात विचार येऊ नयेत म्हणून
रात्रंदिवस फक्त अभ्यास करायची.
आई बाबा जेवायला हाक
मारून थकायचे. एके दिवशी शेवटी
आईने ताट तिच्या रुममध्येच
आणलं. "प्राची काय चालू आहे
हे? अगं तू फक्त
दहावीत आहेस. Don’t get so burn out.
चल जेवून घे. उद्यापासून रोज
चुपचाप घरच्या जेवायच्या वेळा पाळायच्या आणि
आमच्या बरोबर जेवायचं कळलं ?”
प्राची “Okay
ग”
आई “चल जेव
आणि आज जरा लवकर झोप खूप अति चालू आहे तुझं”
खूप दिवसांनी
पोट्भर जेवल्यामुळे प्राचीला जरा आज झोप लागली.
अचानक दारावरची
बेल वाजली. प्राची च्या आईने दार उघडलं. तर दारात विवेक उभा
आई “विवेक अरे
ये आत ये ना”
विवेक “काकू
प्राची आहे का? मला तिच्याकडून पुस्तक घायचं होतं "
आई “थांब हा
बघते काय करते आहे ते . अरे तिने ना आज काल स्वतः:ला रम मध्ये कोंडून घेतलं आहे. सतत अभ्यासच करत असते. प्राची ए प्राची. थांब दरवाजा
बंद आहे "
आई येऊन रूमचा
दरवाजा उघडून बघते तर प्राची गाढ झोपलेली दिसते.
“अरेच्या हिला
झोप लागली वाटतं असंच पांघरूण न घेता झोपलं माझं बाळ." आई अंगावर दुलई घालते,
गालावरून हात फिरवते. लाईट बंद करते आणि हॉल मध्ये येऊन विवेक ला सांगते “अरे झोपली
आहे ती . काय झालं आहे या मुलीला काय माहीत . आज खूप दिवसांनी नीट जेवली आणि झोपली
बघ”.
विवेक “काकू
हरकत नाही मी उद्या येतो”.
हिरमुसला विवेक
निघून जातो.
प्राची सकाळी ६ वाजता उठून आवरते.
आई -"अगं,
एवढ्या सकाळी कुठे निघालीस?"
प्राची -
"आई विसरलीस का? आज extra tests आहे त.
तशीच शाळेत जाईन "
आई -"
प्राची I am so sorry बेटा. I forgot. Breakfast बनवू का पटकन?”
प्राची -
"आई I am already late. I will have something in the canteen. Please give
me some money.”
आई -"
हे घे हे केळ खा जाता जाता आणि
हे पैसे. Please eat something healthy ok. I am so sorry ग.”
प्राची -
"आई, it’s ok. चल मी गेले ग भेटू संध्याकाळी आता direct.”
विवेक सकाळी
९ला येतो
विवेक “काकू
प्राची आहे का? मला तिच्याकडून पुस्तक घायचं होतं "
आई -"
अरे मी विसरले होते. तिला आज extra
tests आहेत आणि मग शाळा आता ती direct संध्याकाळी येईल. तू एक काम कर तिच्या रूममधून
तुला हवं ते पुस्तक घे . उघडीच असेल रम तिची”
विवेक खूप विचार
करून तिच्या रूममध्ये जातो. पुस्तक चाळताना त्याला मागे लपवलेली कवितांची वही दिसते.
एका पानावर अश्रू ओघळलेले असतात आणि एक कविता दिसते
माझे क्षण
माझे क्षण होते भाळण्याचे, प्रेम करण्याचे
आणि आताचे सारे क्षण एकाकी रितेपणाचे
माझे क्षण एकाकी, कोणाची तरी वाट पाहणारे
अन
माझे क्षण मेघ झाले
माझे क्षण बरसून गेले
माझे क्षण झाले शांत रिते आभाळ
माझे क्षण फक्त माझेच राहिले
तारीख तो इथे
नसलेल्या दिवसातली असते. त्याला अतिशय guilty वाटतं.
विवेक रूमच्या
बाहेर येतो
आई -"काय
रे मिळालं का काही ?"
विवेक -
"नाही ना काकू. प्राची आली की मगच येतो . तिचा कधी होतो पण?"
आई -"
दुपारी एक वाजता असतो. पण ती आज संध्याकाळी सहा वाजता यायची आहे "
विवेक -
"Okay काकू. Bye”
विवेक
घरी जाऊन गाडीची किल्ली आणतो.
"आई मला
वेळ होईल. जेवायची वाट पाहू नकोस "
Kick मारून
विवेक प्राची च्या शाळेत जातो. Security guard अडवतो
Security
guard - "कोणाला भेटायचं आहे ?"
विवेक
-"प्राची, प्राची कुलकर्णी. १०वी "
Security
guard - "तुम्ही कोण तिचे? भाऊ का ?"
विवेक
-"नाही, नाही. शेजारी आहे . "
Security
guard - "नाही भेटता येणार. फक्त नातेवाईकच अलाउट आहेत बघा "
विवेक तहान
भूक विसरून तिथे च वाट बघत थांबतो. शेवटी एकदाचे सहा वाजतात आणि प्राची सायकल वर बाहेर
येते
विवेक
-" प्राची प्राची”
प्राचीच्या
काळजाचा ठोका चुकतो. आपण बहुतेक स्वप्न बघत आहोत असं तिला वाटतं
खूप राहिल्यासारखं
दाखवत ती त्याला म्हणते-“ अरे
विवेक तू कसा काय इथे ?”
विवेक
-" प्राची अगं तुलाच
भेटायला आलो होतो पण या काकांनी येऊ नाही दिलं आत मध्ये. I want to talk to you”
प्राची-“I
am really tired Vivek, I am out from morning 6. Can we please talk tomorrow?”
विवेक
-" प्राची please २मिनटं बोल ना”.
प्राची-“
उद्या भेटू हा bye”
विवेक
हताशपणे तिच्या मागोमाग त्याच्या
गाडीवर निघाला.
प्राची
आनंदली आणि रागावली दोन्ही होती
. आज हा प्रथमच शाळेत भेटायला आला . पण ही काय जागा आहे का भेटायची घरी यायचं ना आणि
आता याला काय हवं आहे ? अंग पण finally I met him. Oh my god! I saw him
प्राची ने cycle
park केली.
आई-“
कशी झाली राजा test आणि शाळा ?दमला
का माझा बच्चा ? चल मस्त हे पोहे खा. मी तुझ्या आवडीचा आलं घालून चहा टाकते मस्त
"
प्राची
"आई पोहे मस्त झालेत .
आई -"अगं
प्राची कालपासून विवेक घरी येतो आहे बघ. त्याला पुस्तक हवं होतं कसलं. काल तू झोपली
होतीस तेव्हा आला आणि आज सकाळी ला गेलेलीस तेव्हा आलेला. अरे हे बघ आला परत विवेक.
विवेक पोहे खातोस का? "
विवेक आणि त्याच्या
पाठोपाठ निरुपा पण येते
विवेक बकाबका
पोहे खातो
निरुपा
-"दिवसभर उपाशी राहिलं की असंच होणार . अगं माधुरी दिवसभर न खाता पिता कुठे भटकत
होता काय माहीत "
प्राची आणि
विवेक दोघे एकमेकांकडे बघतात. प्राची ला फार वाईट वाटतं ती हळूच त्याला म्हणते “I
am sorry”
विवेक तिला
हळूच म्हणतो “I am sorry too.”
बाकीचं नंतर
असं खुणावत दोघेही चहा पिऊन शांत होतात