प्राची ला सोडून विवेकने गाडी पार्क केली पण त्याला संध्याकाळ आठवत होती. विवेकला सगळ्यात जास्त लक्षात राहिले प्राचीचे डोळे. खूप curious, खूप नवीन शिकण्याची इच्छा, जग जिंकून घेण्याची इच्छा, खूप प्रेम करायची इच्छा हे सगळं दिसलं त्याला तिच्या डोळ्यात. आणि अचानक आज त्याला त्याची गिटार बाहेर काढावीशी वाटली खूप दिवसांनी.
काही तरी सुचलं खोल आत काहितरी आहे ज्याला बाहेर पडावंसं वाटतंय हे असं आज पर्यंत कधीच नाही झालं आपण तर आजपर्यंत त्याने रूम मध्ये जाऊन case मधून गिटार काढली , तारा पिळल्या आणि सूर झडले जे बाहेर पडलं ते त्याने आज पर्यत कधीच नव्हतं कुठे ऐकलेलं. हे काय झालं, हे काय होतंय आपल्याला?आज पर्यत आपण फक्त सरांनी शिकवलेलं किंवा ऐकलेलं गाणं वाजवलं. हे काय आपल्याला सुचलेलं composition होतं का? त्याने सहज mobile वर record करून ठेवलं. हे काय सगळं त्या डोळ्यांमुळे झालं? खरंच?
प्राची घरात पोचली . माधुरी सुवासिक फुलं देवाला वाहून ध्यान करत बसली होती. तिला disturb होऊ नये म्हणून प्राची हळूच दार न वाजवता रूम मध्ये जाऊन fresh झाली. विवेकचं आजूबाजूला असणं आपल्याला आवडतंय हे तिच्या लक्षात आलंय. खरं तर ८वी पासून वर्गातले एक दोघे आपल्याला आवडतात असं तिला वाटत होत पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून तिने तिच्या अभ्यासावर आणि स्पर्धांवर focus केलं होतं. पण यावेळेला कितीही प्रयत्न केला तरी विवेक सतत आठवत होता अगदी पहिल्या दिवशी पासून ते आता सोडण्यापर्यंतचे सगळे क्षण तिला सतत आठवत होते. खरं तर आठवतं म्हणणं चुकीचं होतं कारण प्रत्येक क्षणी तो तिच्या बरोबर होता. त्याचं रुबाबदार दिसणं, त्याची हुशारी, त्याचं witty असणं सगळंच तिला आवडत होतं. हे नक्की काय आहे हे कसं process करावं तिला काही झेपत नव्हतं . Maths चं पुस्तक काढलं तरी तोच आठवतो जाऊ दे मी ना जरा मराठी च वाचते असं ठरवून तिने पुस्तक काढायच्या ऐवजी वही काढली आणि तिच्या ही नकळत तिच्या हातून ओळी बाहेर पडल्या
गळ्यात खूप काही दाटून
आलं होतं
ओठांना खूप काही सांगायचं
होतं
पण शब्द ओठांना फितूर
झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
डोळ्यात खूप काही दाटून
आलं होतं
डोळ्याना खूप काही सांगायचं
होतं
पण अश्रू डोळ्याना फितूर झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
कधीतरी डोळ्यांना आणि ओठांना मिळेल
साथ
आणि मनात आलेलं सगळ
सांगून टाकेन तुझ्या साठी खास
आज पर्यत प्राचीने फक्त दिलेल्या विषयावर अभ्यास करून विचार करून लिहिलं होतं हे असं काहीतरी प्रथमच तिच्या मनातून बाहेर पडलं होतं. हे काय सगळं लिहिलं आपण ? कोणामुळे? कशामुळे ?
प्राची बंद कर टी वही आणि चुपचाप अभ्यास कर . सगळं मनातून बाहेर काढ
निरुपा - "विवेक चल जेवायला. काय चाललंय रूम मध्ये ?"
प्राचीचे बाबा - "प्राची चल जेवायला. नंतर कर राहिलेला अभ्यास "
विवेकने गिटार कडे एकदा पाहिलं. विवेकने ठेवली
प्राचीने कवितेकडे एकदा पाहिलं वही बंद केली
दोघांनी एकाच वेळी खोलीतले दिवे बंद केले एक सुस्कारा टाकला आणि जेवायला गेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा