खूप आतून असं काहीतरी उफाळून येत असतं
पण नेमके शब्द सापडतच नसतात
मी उगाच अशी चाचपडत राहते
काय सांगायचं आहे आपलं आपल्याला ?
काही उमगत नसतं
काय हवं आहे ते ही कळत नसतं
कसं रहायचं कसं वागायचे ?
कसं बोलायचं कसं चालायचं ?
कसं जगायचं भरभरून आणि कसं मनमोकळं खूप हसायचं ?
कसं नाही जगायचं उगाच चोरून ?
कसे मोकळे होऊ द्यायचे श्वास ?
कसे घ्यायचे अगदी आतून हुंकार ?
रसरसून जगायचंय मायासारखं इजाजत मधल्या
झुगारून द्यायचे आहेत सगळे निर्बंध
आणि मुक्त व्हायचंय आतून बाहेरून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा