ती class ला जाऊन आली आणि सायकल स्टॅन्ड ला लावत होती तेव्हा तो टांग्यातून खाली उतरला.
"अरे हा कोण बरं इतका देखणा मुलगा ?" ती मनात विचार करत होती. १०वी त असताना असा विचार मनात येणं योग्य आहे असं आपल्या आईला पटेल का? तिनं मनातून पटकन विचार झटकून टाकला आणि ती घरात शिरली
“अग समोर कोणी तरी नवीन बिऱ्हाड आलं वाटतं रहायला. सामान नुकतंच उतरवत आहेत . प्राची जा बरं त्यांना काही हवं नको विचार . नाही तर थांब मीच विचारते” आई म्हणाली.
आई - “हैलो मी माधुरी कुलकर्णी इथे समोर राहते . तुमचं सामान येताना दिसलं म्हंणून वाटलं विचारावं काही हवं नको आहे का ते”
“हैलो मी निरुपा देशपांडे. हा माझा मुलगा विवेक. Mister अजून येत आहेत मागून”
आई - “ते आले की मग या चहाला आमच्याकडे. सामान लागायला अजून वेळ लागेल ना”
निरुपा – “अहो नको हो तुम्हाला कशाला त्रास. सामान लावलं की करेन मी”
आई -“ नको म्हणू नका . याच वाट बघते. तोपर्यंत पाणी वगैरे काही हवं असेल तर प्राची ला पाठवते म्हणजे माझ्या मुलीला”
निरुपा –“ बरं येतो तासाभरात . पाणी आता तरी नको आहे”
आई -“ प्राची जरा आवर इथलं सगळं येतील देशपांडे मंडळी तासाभरात”
प्राची –“ आई आता हे कोण देशपांडे?”
आई -“ अगं ते समोर रहायला आलेलं नवीन बिऱ्हाड”
प्राची –“ कमाल आहे हा आई तुझी. अगं कोण कुठले ते आणि घरी काय बोलावतेस लगेच!”
आई -“ अगं याला शेजारधर्म म्हणतात. आता नुकतेच आलेत. सामान लागलं की करतील आपलं आपलं. प्राची थोडं माणसांच्या उपयोगी पडावं ग . याला च माणसाने माणसाशी माणसासम वागणं म्हणतात "
प्राची हात जोडून म्हणाली -"माते तू धन्य आहेस. कुठे काय गाणं चिटकवशील काही सांगता येत नाही. पण दर वेळेला हे करायलाच पाहिजे का विचार कर बाई "
आई -“ अगं राणी कळेल तुला ही कधी तरी चल आवर जरा. मी पटकन ढोकळा पण करते. चहा बरोबर म्हणजे त्यांना जरा बरं पडेल”
काय हवा तो गोंधळ घाल असा चेहरा करून प्राची निघून गेली. तिला उद्याच्या टेस्ट चा अभ्यास करण्याचा होता. बाहेरच्या रूम मधलं आपलं सामान उचलून टी आत निघून गेली. उद्या च्या मॅथ्स च्या टेस्टचं जरा तिला टेन्शन आलं होतं.
तासाभरात देशपांडे मंडळी आली. प्राची चे बाबा पण ऑफिस मधून आले. हाय हैलो झालं मंडळी स्थानापन्न झाली
आई -“ प्राची, प्राची”
प्राची –“ आतूनच अगं आई का ओरडते आहेस. मी अभ्यास करते आहे उद्याचा”
आई kitchen मधून परत ओरडते -“ प्राची, प्राची”
प्राची हॉल मध्ये येऊन जोरात ओरडते – “अगं आई मी उद्याच्या मॅथ्स टेस्ट चा अभ्यास करते आहे का एवढी ओरडते आहेस” समोर लोक बघून ती चपापते आणि kitchen मध्ये जाऊन हळूच विचारते – “काय झालं का ओरडत होतीस?”
आई – “देशपांडे मंडळी आलीत. ये बोलायला जरा”
प्राची=” अगं आई मला already खूप tension आली उद्याच्या टेस्ट च”
आई – “class चीच तर टेस्ट आहे. ५ मिनटं बसून मग जा. ओळख करून घे. ह्या ढोकळ्याच्या plates tray मध्ये ठेव आणि चल बाहेर घेऊन”
निरुपा – “अहो कशाला एवढा सगळं घाट घातलात ? उगाच तुम्हाला त्रास”
आई – “अहो शिरीष पण बँकेतून आता आला. थोडं सगळं जास्त केलं इतकंच. ही आमची प्राची बरं का. या वर्षी १०वि त आहे”
निरुपा – “Hi प्राची. आणि हा आमचा विवेक बरं का. १२वि झाली. Engineering च्या admission process ची वाट बघतो आहे”.
प्राची=” Hello All ”. मनात -" ओह हो. Hi handsome”
प्राची=” आई मी please जाऊ का माझ्या खोलीत?”
निरुपा – “का गं आम्ही नाही आवडलो का तुला किंवा आम्ही आलेलं ?”
प्राची=” नाही काकू असं नाही माझी उद्या क्लास ची मॅथ्स टेस्ट आहे आणि मला एक टॉपिक नीट जमत नाही आहे जरा टेन्शन आलंय मला. Please don’t misunderstand”
निरुपा – “हातिच्या ! मग हा विवेक आहे की. Mathematics त्याचा आवडता विषय आहे”
विवेकने अत्यंत नाराज होऊन आईकडे पाहिलं. आता ही मुलगी कशाला अजून असं त्याचं expression होतं.
आई – “अरे व बरं झालं प्राची मग तुमच्या खाण्याच्या plates पण आतच घेऊन जा”
प्राची- ”Vivek, are you ok with this? It’s ok जर तुला इच्छा नसेल तर”
विवेक-“No, it’s alright. सांग मला काय जमत नाही आहे”
प्राची आणि विवेक आत खोलीत गेले. खोलीत एक अख्खी भिंत भरून पुस्तकं बघितली आणि विवेक खुश होऊन गेला .
विवेक- “Woow कोणाची आहेत हे एवढी पुस्तकं?”
प्राची-“ माझी. मला पुस्तकं खूप आवडतात. मी मला दिलेल्या खाऊच्या पुस्तकातून फक्त पुस्तकच विकत घेते आणि मग माझी आवड बघून मला नेहमी पुस्तकच gift म्हणून मिळतात”
विवेक-“I would be so happy to collect books! पण बाबांची फिरतीची नोकरी असल्यामुळे मला हे असं कधीच करता आले नाही. मी आपली ही भूक library त च भागवतो”
प्राची-“You can lent any book from me Vivek. फक्त नीट काळजी घे, bookmark वापर आणि पुस्तक असं उलटं ठेवू नकोस इतकंच”
विवेक-“अगं हे same आहे आपलं”
मग ते दोघे मॅथ्स च्या topic मध्ये हरवून गेले.
प्राची-“Woow Vivek you made this so easy. इतकं छान कळलं मला आता. मी हे परत कधीच विसरणार नाही”
विवेक-“You are most welcome गुरुदक्षिणा म्हणून आज हे Richard Bach च हे पुस्तक घेऊन जातोय”
प्राची-“ अरे कुठलं हवं ते ने”
आणि त्या नंतर प्रथमच विवेकने तिच्याकडे नीट पाहिलं. गोरी, नीटस, केसाच्या दोन वेण्या, ती curious जगातलं सगळं जाणून घ्यायची तिची इच्छा त्याला फार आवडली
प्राची ला कळलं की हा नुसताच देखणा नाही. हा well-read, well-mannered आणि हुशार मुलगा आहे.
ही त्या दोघांची पहिली भेट त्यांना फार आवडली
अप्रतिम लिहिली आहे कथा, खूप आवडली , waiting for next...
उत्तर द्याहटवा