आणि मग मध्ये खूप दिवस गेले. प्राची १०वीचे classes, tests आणि शाळा यामध्ये खूप busy होऊन गेली. खरं तर प्राचीला class ला गेल्यावर, शाळेत गेल्यावर विवेकची खूप आठवण यायची. त्याची एक तरं झलक मिळावी असं तिला सतत वाटत रहायचं. त्याच्याशी खूप बोलावं त्याच्याबरोबर परत परत ride ला जावं असं तिला वाटायचं. त्याचं हसणं त्याचं बोलणं आठवलं की काळजात एक कळ यायची. कसं बरं त्याला भेटायला मिळेल ? एकदा phone करून बघावा का? नको नको. त्याने तर आपल्याला एकदा पण करायचा प्रयत्न केला नाही. तो तर ना पुस्तक मागायला आला ना त्याने विचारलं की मला काही अडलं आहे का. त्याला बहुतेक माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर असं गळ्यात पडल्यासारखं वाटेल ना. माझं काही चुकलं असेल का ? मी दिसायला किंवा वागायला इतकी वाईट आहे का की त्याला परत कधीच माझ्याशी contact करावासा नाही वाटला? बरं मी केला contact त्याला आणि त्याने मला ghost केलं तर? छे छे नकोच ते. मी आपलं स्वतःला अभ्यासात इतकं गुंतवून घेते की मला त्याची आठवण च नाही आली पाहिजे पण इतकं सोपं नाही ना ते माझ्यासाठी. अगं बाई कोण तो आता आलेला विवेक काय एवढं त्याच्यात इतकं का गुंतावं मी त्याच्यात असं का होतंय मला? हे असं झुरणं का तेच तिला कळत नव्हतं . हे नक्की काय आहे? इतकं त्या माणसामध्ये काय आहे? या आधी इतकं वाईट तिला कधी वाटलं नव्हतं. रोज असं वाटायचं एकदा तो नुसता दिसावा कधी तरी च्या बाहेर तो आला आहे असा भास तिला व्हायचा.
Be yourself प्राची. Just work on yourself. Just do your studies and that’s it.
एके दिवशी निरुपा अचानक घरी आली. "माधुरी आहेस का ग ?"
माधुरी-"अगं निरुपा ये ना. खूप दिवसात दिसली नाहीस ग."
निरुपा-"अगं हो आम्ही ना कर्जत ला गेलेलो माझ्या सासूबाईंची अचानक pacemaker surgery करावी लागली".
माधुरी-"अरे बापरे . अगं कळवायचंस की. आमची काही मदत झाली असती"
निरुपा-"अगं प्राची आणि तू आज माझ्याकडे जेवायला येता का? मी एकटीच आहे. हे दोघे अजून कर्जत लाच राहिले आहेत. जरा सोबत होईल मला आणि जरा बरं पण वाटेल "
माधुरी-"अगं निरुपा तूच ये ना इथे . Already तुझी खूप दगदग झाली असेल "
निरुपा-"अगं तुम्ही या ना दोघी. मी फक्त खिचडी टाकते. "
माधुरी-" बरं मग मी tomato soup घेऊन येते. येतो आम्ही ७.३० ला . चालेल ना ?”
माधुरी-"प्राची, अगं प्राची”
प्राची रूम मधूनच ओरडली-“आई काय ग? अभ्यास करते आहे.”
माधुरी-" आपल्याला आज देशपांड्यांकडे dinner ला जायचं आहे. काय झालं माहिती का….”
प्राची ला पुढलं काही ऐकूच आलं नाही. She was already on cloud nine. आता आपण काय घालू या कसं दिसू या म्हणजे विवेक impress होईल असा ती विचार करत राहिली . नको नको सगळ्यांच्या लक्षात येईल आपण आपलं normal च जाऊ या.
प्राची तयार होऊन खाली आली. तिने फक्त डोळ्यात काजळ घातलं
माधुरी-"काय गं? आज हे काय नवीन ?"
प्राची- "अगं जरा स्वतः साठीच असा विचार केला."
माधुरीने ऐकावं ते नवलच असा विचार केला आणि त्या देशपांड्यांकडे निघाल्या
आता विवेक असा समोर दिसेल आपण कसं करायचं त्याच्यावर रागवायचं का त्याच्याशी खूप बोलायचं? तिच्या छातीत तो आता दिसणार हा विचार करूनच धडधडायला लागलं. तिने थरथरत घराची bell वाजवली.
निरूपाने दार उघडलं.
निरूपा-“या ग. Thank you so much for coming”
माधुरी-”Thank you काय अगं. Come on.”
निरूपा-“ लगेच बसुया का जेवायला? प्राची ला पण अभ्यास असेल ना ? कसा चालू आहे बाळा १०विचा अभ्यास ?”
प्राची- " छान चालू आहे काकू. पण आपण ३च ? बाकीचे सगळे ?”
माधुरी-” अगं काय कमाल करतेस. मघाशी सगळं सांगितलं की मी तुला ओरडून ? विवेक च्या आजीची emergency मध्ये pacemaker surgery झाली. विवेक आणि त्याचे बाबा तिथेच आहेत. निरूपाची रजा संपली”
प्राची- " Oh I missed that.” तिच्या डोळ्यात दुःखाने अगदी पाणी जमा व्हायला लागलं. किती ही निराशा!
निरूपा-“ अगं प्राची तू का रडतेस ?“
माधुरी-” खूप sensitive आहे अगं ती . प्राची बऱ्या आहेत ग त्या.”
निरूपा-“ Bandage आहे ना अजून म्हणून ते दोघे अजून तिथे राहिले आहेत. चला गरम आहे तोवर जेवू या”
प्राची ची भूक च मेली. तिघी जेवल्या . निरुपा आणि माधुरी मागचं आवरत होत्या.
निरूपा-“ प्राची bore होत असेल तर ती रूम बघ. विवेकची आहे. काही तरी interesting मिळेल तुला”
नेकी और पुछ, पुछ असं झालं प्राचीला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन ती विवेकच्या खोलीत गेली. त्याच्या table वर अनेक universities चे brochures पडले होते. भारताबाहेरच्या universities चे brochures पण तिथे होते
प्राची-“ निरूपा काकू हे काय आहे?”
निरूपा-“ अगं मंदार म्हणजे विवेकच्या बाबांच्या सांगण्यावरून त्याने भारताबाहेर पण applications टाकले.”
प्राची ला त्या पुढचं काहीच सहन होईना
प्राची -"काकू आई मी घरी जाते. खूप अभ्यास राहिला आहे”
प्राची रूममध्ये आली. दुःखाचा आवेग तिला सहन नाही झाला. तिने अश्रुना त्यांची वाट मोकळी करून दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा