मंगळवार, २७ जून, २०२३

Confusion

 

How does it feel when someone just abandon you? Just remove from his/her life totally? They say action has consequences; then how come they don’t feel them? Why do I care for people so much? Why is it important to have them in my life?

Why change is so difficult? Do I call myself sensitive? Is that why I can’t accept change in my life? what do other people do with the change? How do they cope up with their situation?

 Why do I need to talk? Why do I need people to talk and share? Why can’t I share things just with myself? Why it is so important to talk about every small thing with someone? Why should I keep people updated?

Why do I do with life?

शुक्रवार, २३ जून, २०२३

Empty Nest

 Empty nest

Empty nest is void

It is totally empty

It has volume of loneliness

Full of darkness

How can you fill it with love?

How to have that self-love?

How to enjoy the company of your own self?

Do you just need to keep on doing one task after another?

Do you just need to keep on one activity after another?

How to find peace and happiness?

Love and dating are not in your control

Do you just need to cry out loud?

Do you need to let go?

Do you need to accept the situation and cope up with it?

What do you need to do?

 

 

 

 

 

बुधवार, २१ जून, २०२३

गणपती अथर्वशीर्ष

 

Swimming pool मध्ये तो शिरला आणि त्याने गणपती अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली “ओम नमस्ते गणपतये “,

 "अरे च्यायला आली का ही मुलगी " अरे बाबा कर तुझ्या अथर्वशीर्ष वर concentrate. हा तर  "त्वमेव प्रत्यक्षम"

"अरे आज हिने केसावर टोपी का बरं नाही घातली? छान सुन्दर आहेत हिचे केस. या केसांमधून हात फिरवता आला तर काय मज्जा येईल !! आणि हो आजचा हा निळा costume फारच छान दिसतो आहे हिला. येतेस का ग जरा जवळ छान वाटेल”

"त्वमेव केवलं कर्तासी” , “अग बाई एवढ्या जोरजोरात चालत येऊ नकोस माझ्यासमोरून , त्याहीपेक्षा जोरात मग माझं ह्रदय धावायला लागतं. नुसतं पायासाठी नाही ग मी तर माझा heart rate कमी असावा या करता पण येतो बाई इथे. जा लांब जा”

“काय हो आज तुमचा फोटो पहिला पेपर मध्ये छान वाटलं बघून”, “thank you madam येत असतात अधून मधून”

निळ्या costume वालीने बाईंना विचारलं “कोण आहेत हो हे”. हे ना खूप मोठे historian आहेत. एका मोठ्या insititute चे chairman आहेत हे”.

“अग बाई अशी का माझ्याकडे रोखून बघते आहेस ? तुला कळलं काय माझ्या मनात काय चाललं आहे ते ? मुलींना sixth sense असतो म्हणे. अग का मला एवढी निरखून बघते आहेस? तुला ही मी आवडलो का? बापरे हीचा session संपत आला तर का बरं ही परत माझ्या side ला येते आहे ? काय करावं आता? जाऊ दे जोरजोरात अथर्वशीर्ष  च म्हणतो “त्वम साक्षात आत्मसि”

“Hello” निळा costume घातलेली सुन्दर केसांची मुलगी आपले डोळे मिचमिचत म्हणाली “Uncle you are so great!! You are a historian!! I am doing my major in history. Can you please teach me?”

तो उभ्या उभ्या गार झाला, “UNCLE”…. एकदम खिन्न आणि क्षीण स्वरात म्हणाला – “हो का नाही ? कधी चालू करू या ?”

“रोज इथेच या swimming pool मध्ये , याच वेळी चालेल का तुम्हाला? मी uncle म्हणू की sir?”

“Sir would be better” तो अगदी निराश होऊन म्हणाला.

“Ok sir see you tomorrow.”

Swimming pool  च्या बाहेर पडणाऱ्या तिच्याकडे शेवटपर्यंत बघत त्याने परत एकदा पडलेल्या आवाजात अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शुक्रवार, ९ जून, २०२३

बाक

 मग्न तळ्याकाठी सुन्न एक झाड
त्यासमोर दोन एकले बाक
विसावले मी त्यातल्या एका बाकावर
कोणाच्या सोबतीची मनी ठेऊन आस
काय गमावले काय राहिले
या हिशेबाचे नव्हते भान
तुझ्या सोबतीत वाटावे विझावे माझे श्वास 

गुरुवार, ८ जून, २०२३

माझे बाबा

 

आपल्याला वाटतं असतं यांचं जाणं आपण स्वीकारलं आहे पण अचानक पावसाची सर कोसळावी तशी यांची आठवण येते आणि आपण सैरभैर होतो. सगळं बालपण समोर उभं ठाकत आणि काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशोब सुरु होतो. मग वाटतं कशाला हिशोब, नुसती यांची आठवण ठेवू या जवळ आणि जगू या आजचा दिवस. आली परत आठवण तर परत रडू, परत हसू. ते जसे अचानक गेले तसं कदाचित अचानक आपल्याही नकळत या जगातून exit घेऊ
पण तो पर्यंत हे शब्द जवळ ठेवू
ग्रीष्माच्या उन्हाळ्यात
तुमची आठवण आली बाबा खूप
आई गेल्यानंतर जेवढं पोरकं
नाही वाटलं तेवढं आता वाटलं
माझा बाप मला खूप पैसे नाही देऊ शकला
पण उदंड संस्कार देऊन गेला
त्याने मला लढायला शिकवलं
परिस्थितीबरोबर, लोकांबरोबर
पण स्वतःचं मी पण टिकवून
त्याने मला उभं रहायला शिकवलं
प्रसंगी परिस्थितीसमोर, लोकांसमोर वाकून
तो फारसा लढवया नव्हता पण
काय बरोबर काय चूक ते शिकून
वागणारा होता
तो फार प्रसिद्ध नव्हता पण
एक चांगला माणूस होता
मला एक चांगला माणूस बनवल्याबद्दल
बाबा तुमचे खूप आभार