शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

संध्याकाळ

संध्याकाळची हलकीशी तिरीप दाराशी आली आणि तिला कळल संध्याकाळ हळूहळू येते आहे दाराशी. दिवस संपत आला. हलकेच उठून झोक्यावर बसत तिने खिडकीच्या बाहेर पाहिलं, हलक उन आणि सुर्यास्तामुळे झाड पण वेगळीच भासत होती. तिने पटकन स्वतःसाठी चहाच आधण चढवल,  आलं किसून टाकल आणि चहा उकळेपर्यंत स्वयंपाकघराच्या खिडकीतून पक्ष्यांची लगबग ऐकत राहिली. मस्त वाफाळणारा चहा कपात ओतून तिने पटकन दार उघडले आणि समोरच्या पायरीवर आपली बैठक जमवली. तिचा हा रोजचा आवडता उद्योग. दिवसभर थकलेल्या या पक्षी, झाड, वेली यांबरोबर सूर्यास्त अनुभवण हि कशी वेगळी मजा आहे हे त्यान तिला शिकवलं. घरासमोरच अंगण एकदम वेगळच भासायला लागत. अनेक पक्ष्यांचे येणारे वेगवेगळे आवाज, त्यांना साथ देणारी पानांची सळसळ, या सगळ्यात कधी तरी मध्येच येणारी निस्तब्ध्ता आणि अशा वेळेला जाणवणारी फक्त वारयाची झुळूक. त्या बरोबर येणारा असंख्य फुलांचा घमघमात. स्वतःसाठी तो असा खूप वेळा वेळ शोधून काढायचा आणि असे छोटे छोटे क्षण तिच्याबरोबर उत्कटपणे घालवायचा. असा सूर्यास्त बघायला मग शब्द लागायचे नाहीत. एकमेकांबरोबर अस अनुभवण हा च एक सोहळा होऊन जायचा. तिला आठवला त्याचा फोटो पाठून काढलेला - प्रकाशाच्या समोर उभा असलेला ..किती छान दिसतो हा असा. मावळत्या सूर्याला सलामी देत असतानाचा.
त्याच्यावर आपलं अजून पण तेवढच प्रेम आहे. तोच तर येतो भेटीला या प्रत्येक संध्याकालेतून. या जाणीवेने ती मोहरून गेली. त्यची अशी नव्याने झालेली ओळख तिला आवडली.

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

Jigsaw Puzzle

आयुष्य मला समोर चित्र नसलेल्या jigsaw puzzle सारख वाटत. आपण माहित नसलेला एक एक भाग जोडत जातो. जर ते दोन बाग जोडले जाणार असतील तर जुळतात आणि मग त्या दोन भागांपुरत तरी अगदी अंधुक  चित्र स्पष्ट होतं. जन्मल्यापासून कळत्या वयात जाण्यापूर्वी आपण असेच माहीत नसलेले, कळत नसलेले संदर्भ, भाग जोडत जातो.  कळत्या वयात आणि आयुष्याच्या मध्यावर काही भाग आपण समजून उमजून जोडतो तर काही भाग आपल्याही नकळत जोडले जातात. काही जण चित्र पूर्ण होण्याआधीच डाव उधळून निघून जातात तर काहीना पूर्ण चित्र कळल्यानंतरही अगदी छोटासा भाग कुठे हरवला आहे हे शोधत जगाव लागत. काहीना त्यांच्या आयुष्याची मोठी मोठी कोडी भराभर उमजतात तर काहीना बराच वेळ लागतो. चित्र पूर्ण करण्याचा ज्याची त्याची वेळ मात्र पूर्ण वेगळी असते. चित्राचे भाग काही अंशी सारखे असले  तरीही पूर्ण होणार प्रत्येकाचं चित्र मात्र बरंच वेगळ असतं.

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

डोळ्यांच्या पापण्या  मिटल्या आणि आठवणी डोळ्यात  साठल्या. ह्रिदयाचा कप्पा उघडून आणखी आठवणी बाहेर पडल्या. त्यांचा एकमेकांशी संवाद होऊ लागला. अशावेळी  माझी हि झोप उडून जाते आणि मग मी हि त्या आठवणीशी अजून संवाद साधते. मन हि मग काबूत रहात नाही. कधी हि आठवण उलगड तर कधी त्या आठवणीच्या खोलात शीर अस काहीतरी चालू होत. सगळ्या शरीराचा आणि मनाचा झोपेसाठी झगडा चालू होतो. आठवणीचे कसले कसले संदर्भ आठवायला लागतात. काही आठवणी स्पर्श करून ओलचिंब करतात तर काही थोड्या दुरून च लांब निघून जातात. त्यानाही तुझ्या सारखीच माझ्या जवळ येऊन गुंतून पडायची भीती वाटते बहुदा. काही आठवणी जणू पद्मासन घालून ध्यानालाच बसतात. तर काही आठवणी हलक्या हलक्या लांब निघून जातात. तुझ्या कुठल्याच आठवणी कधीच कुठेच जात नाहीत. त्या सगळ्या माझ्या नसानसात भिनल्या आहेत. त्या वेगळ्या आठवत नाहीत त्या सतत माझ्या आजूबाजूला रुंजी घालत असतात. तुझा रहाण आणि भेटण भलेही तात्पुरत होत तुझ्यासाठी, पण माझ्या साठी ती खूप मोठी ठेव आहे. खूप मौल्यवान आहे ते सगळ माझ्यासाठी. माणसाला मोह सुटत नाही म्हणतात तस मला अजूनही तुला भेटावस वाटत आणखी थोड्या आठवणी ओंजळीत भरून घ्याव्याश्या वाटतात. त्यांचा सुगंध नसानसात भरून तृप्त व्हाव असही वाटत. पण भेटत नसल्यामुळे जी अनामिक हुरहूर दाटते ती तुझ्या  आठवणींच्या मात्र अजून जवळ नेते हे खर आहे.

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

मन दुखी आहे कि आनंदी कस ठरवायचं?
मन गुंतलं आहे कि सुटल कस बघायचं ?
कस आवरायचं मनाला परत परत?
कस सावरायचं स्वतःला परत परत?
कोसळणारया धबधब्याला पाणी आवरून कोसळणं
कस शिकवायचं?
भिजणारया गात्राला कोरड राहून भिजायला
कस सांगायच?
प्रेम घेऊन वाहणारया नदीला प्रेम  आटवायला
कस सांगायच?
फुललेल्या फुलाला सुगंध न देता दरवळायला
कस सांगायच?
कोसळणं हा झरयाचा धर्म आहे, भिजण हे गात्राचं  मागणं आहे.
वाहणं हि नदीची प्रथा आहे तर दरवळणं हा फुलाचा नियम आहे.
निसर्गाच्या विरुद्ध काहीच होत नाही आणि मी हि निसर्गाचाच एक भाग आहे.
काय सुरु झालं काय संपल
काय चालू आहे याचा कसा हिशेब मांडायचा ?
कमावलेले क्षण किती गमावलेले क्षण किती
याचा कसा शोध लावायचा ?
शेवटच्या क्षणापर्यंत माणूस कसा हे कळत नाही
तर माणसाशी कस वागायचं याचा कसा थांग लावायचा?
    वादळ रात्र दाटते मनात,तुझी आठवण येऊन.वाट शोधते मी त्या वादळात तुझ्यापर्यंत पोचण्याची. ती वादळवाट तुझ्या पर्यंत पोहोचवेल  का मला हे माही नसतं पण तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या इच्छेने मी चालत  रहाते. तुला मनात साठवून प्रवासाला सुरुवात करते आणि वाटेत सगळीकडे तूच भेटत रहातोस. कधी सरींच्या रुपात, कधी वाऱ्याचा झुळूकीत, कधी पानांच्या सळसळयातून, कधी चंद्र्म्यातून . तझा असा होणारा स्पर्श मला मोहून टाकतो. मी थांबते वाटत पोचले  मी तुझ्यापर्यंत. पण अरे ते सगळे भासच असतात. वाट पुढे निघून गेलेली असते. केवढी धांदल उडते माझी तिथवर पोचताना. परत प्रवास चालू होतो. मध्येच तुझा वाक्य आठवत

Life is journey madam not destination

    हं म्हणून तर तुझ्या वाटेवर चालत रहाते तुला शोधत.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

आठवतोस तू मला अजून तू  जेव्हां मी प्रथम तुला पाहिलं. असा सिंहासारखा डौलात स्वत:च्याच मस्तीत चालत आलास. उगाच नाही म्हणत मी तू तुझा खूप आवडता आहेस म्हणून. तू स्वतः वर खूप खूप प्रेम करतोस. स्वतःला खूप जपतोस. स्वतःला त्रास होईल असा काही वागत नाहीस. असं दाखवून तरी देतोस हा. पण मला माहीत आहे. तुला ही त्रास होतो. तू स्वतःला अलिप्त ठेवतोस आणि दाखवतोस कि मला काहीच फरक पडत नाही. पण मला जेव्हा त्रास होतो तो पोचतो तुझ्यापर्यंत. मी आता तुला खूप चांगल  ओळखायला लागले आहे रे. मला काय हव आहे तुझ्याकडून ? चार प्रेमळ शब्द. कधी तरी कशी आहेस ग? असा एखादा फोन. बस्स! तू मला काय देणार आणि मी तुला?
मला आपलं नातं या सगळ्यांच्या पलीकडे वाटत. आ हा मी काय नात आहे शोधत नाही आहे त्याला लेबलं हि नाही लावत आहे. पण कुठेतरी मनाच्या आत  तू फक्त माझा असतोस. फक्त माझा स्वतःचा. तिथे मी तुझ्यावर प्रेम करते, कधी तुझ्याशी भांडते , कधी तुला तुझ्या मनातलं सगळं विचारते तर कधी माझ्या मनातलं सगळं सांगते. तुझ्याबरोबर लांब फिरायला जाते तर कधी long drive ला. मी तुझ्याशी खूप खूप बोलते. माझं आणि तुझं एकटेपण घालवते. हे नातं मला असंच जपायचं आहे. घट्ट धरून ठेवायचं आहे. कुठल्याही अपेक्षांचे स्पर्श त्या नात्याला होऊ द्यायचे नाहीत.