गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

Jigsaw Puzzle

आयुष्य मला समोर चित्र नसलेल्या jigsaw puzzle सारख वाटत. आपण माहित नसलेला एक एक भाग जोडत जातो. जर ते दोन बाग जोडले जाणार असतील तर जुळतात आणि मग त्या दोन भागांपुरत तरी अगदी अंधुक  चित्र स्पष्ट होतं. जन्मल्यापासून कळत्या वयात जाण्यापूर्वी आपण असेच माहीत नसलेले, कळत नसलेले संदर्भ, भाग जोडत जातो.  कळत्या वयात आणि आयुष्याच्या मध्यावर काही भाग आपण समजून उमजून जोडतो तर काही भाग आपल्याही नकळत जोडले जातात. काही जण चित्र पूर्ण होण्याआधीच डाव उधळून निघून जातात तर काहीना पूर्ण चित्र कळल्यानंतरही अगदी छोटासा भाग कुठे हरवला आहे हे शोधत जगाव लागत. काहीना त्यांच्या आयुष्याची मोठी मोठी कोडी भराभर उमजतात तर काहीना बराच वेळ लागतो. चित्र पूर्ण करण्याचा ज्याची त्याची वेळ मात्र पूर्ण वेगळी असते. चित्राचे भाग काही अंशी सारखे असले  तरीही पूर्ण होणार प्रत्येकाचं चित्र मात्र बरंच वेगळ असतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा