सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

मन दुखी आहे कि आनंदी कस ठरवायचं?
मन गुंतलं आहे कि सुटल कस बघायचं ?
कस आवरायचं मनाला परत परत?
कस सावरायचं स्वतःला परत परत?
कोसळणारया धबधब्याला पाणी आवरून कोसळणं
कस शिकवायचं?
भिजणारया गात्राला कोरड राहून भिजायला
कस सांगायच?
प्रेम घेऊन वाहणारया नदीला प्रेम  आटवायला
कस सांगायच?
फुललेल्या फुलाला सुगंध न देता दरवळायला
कस सांगायच?
कोसळणं हा झरयाचा धर्म आहे, भिजण हे गात्राचं  मागणं आहे.
वाहणं हि नदीची प्रथा आहे तर दरवळणं हा फुलाचा नियम आहे.
निसर्गाच्या विरुद्ध काहीच होत नाही आणि मी हि निसर्गाचाच एक भाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा