सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

माणस

आधी लिहिलेलं तिचंच वाक्य तिने अनेक वर्षांनी वाचल  'तिला वाटल आपण फक्त आयुष्यातले टप्पेच जपून ठेवले आहेत.' कुठल्या विचारांमध्ये हे वाक्य लिहिलेलं असावं काय माहित? हो आपलं आयुष्य कसं असावं, आपल्या आयुष्यात काय असावं आणि काय असू नये याचा तिने कधीच विचार केला नव्हता, हे खर आहे. कदाचित टप्पे हि लक्षात ठेवले असतील पण तिचा लढा हा सर्वस्वी तिचा होता. तो तिची तिच लढली. तिच्या priorities तिने नीट समजावून घेतल्या. अनेक टप्प्यांवर अनेक माणसे सोडून गेली ती माणस आपण नाही विसरलो. खर तर या माणसांच्या सहवासातून आपण अजून घडलो, उमललो, फुललो, बहरलो हे तिला कळल आणि इतक्या वर्षांनीही तिला इतका आनंद झाला.
प्रत्येक प्रसंगाला कणखरपणे सामोरी जा हे सांगणारे तिचे वडील, हे संगव्णती आई, कर्तुत्वाचा मोठा आलेख पुढे ठेवणारा तिचा भाऊ, तिला उत्तमोत्तम वाचायला देणारी तिची बहिण. कला संगीत साहित्य यांची आवड न्क्लत्प्ने जोपासणार्या तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्यामुळे घडत गेलेली ती, उत्तम संस्कार करणारे तिचे शिक्षक, कवितेची ओळख घडवून देणारा आणि तिच्या प्रत्येक पहिल्या कवितेचा वाचक असलेला तिचा मित्र, मुलगा देखणा असू शकतो आणि त्याच्याकडे कसं आकर्षित व्हायचं हे सांगणारा तिचा प्रियकर, शिक्षणात रस घेऊनही बाकीच्या अनेक गोष्टी करत शिक्षण संपवणारे तिचे अनेक मित्रमैत्रिणी, उत्तम करिअर करत बाकीच्या आवडी सहजतेने जपणारा काही प्रसंगी हळूवार तर काही प्रसंगी चिडणारा तिचा नवरा. तिला तिची जागा योग्यपणे दाखवून कुठे मार्गक्रमण करावी हे शिकवणारा तिचा गुरु. तिला काय संज्ञाच आहे ते न सांगताच समजणारी तिची मैत्रीण . काय काय वाचावं,  काय काय  एऐकाव आणि काय काय टिपाव हे सांगणारे तिचे मित्रमैत्रिणी, भाऊ सखे आणि जिवलग. परिस्थितीवर मात करून आयुष्य सहजतेन जगायला शिकवणारी सासू. असे कितीतरी लोकं ज्यांच्यामुळे ती घडली, फुलली आणि फुलात राहिली. नुसते टप्पे नाही तर हि माणसहि आपण लक्षात ठेवली आहेतच की!

टप्पे

आजूबाजूच्या व्यक्ती आणि त्यांची आयुष्य. ध्येयासाठी, स्वतच्या समाधानासाठी झटणारी लोकं. यांना आयुष्यात नक्की काय हव असेल याचा ती विचार करत होती.
थोडीशी हळूवार, बरीचशी practical आणि अजून कितीतरी न उमगलेली स्वाती, बरीचशी अवखळ पण  तितकीच विचारी असलेली पल्लवी, हिला आयुष्य नक्कीच उमगल  आहे आशी वाटणारी शांत मंद तेवणारी दीपिका, स्वतःला काय हव आहे हे माहित असणारा आणि सगळ्यांशी खेळीमेळीने वागणारा पण अजूनही तितकाच  reserve असणारा संदीप, स्वतच्या छदालाच  व्यवसाय बनवून त्यात झोकून देणारा तिचा  मित्र, फक्त कामापुरताच संबंध ठेवणारे पूर्णपणे professional असलेले, स्वतःच्याच मस्तीत जगणारे तिचे सहकारी! प्रत्येक जण अजिबात मोजून मापून दिलेलं आयुष्य जगत नव्हता, चौकटीतल तर नाहीच नाही. या प्रत्येकाला जगण्याच ध्येयं माहित होत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचं जगण सोप सुटसुटीत आणि छान बनवलं होत. तिला वाटल त्यांच्याही आयुष्यात problems असतीलच ना? पण म्हणून काय ते सतत रडत आहेत? जगण्याचा समरसून आनंद घेणारी तिची जिवलग मैत्रीण! तिला मनाशीच हसू आल. किती सुंदर आयुष्य आहे तिचं !
तिला आठवले स्वतच्या जगण्याचे टप्पे - वेवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगातून आणि वेगवेगळ्या माणसांबरोबर घालवलेल आयुष्यं. तिला वाटलं आजही आपल्याला आयुष्याचा अर्थ कळलाच नाही. तिला वाटल आपण फक्त आयुष्यातले टप्पेच जपून ठेवले आहेत.

शनिवार, ३ सप्टेंबर, २०११

वलय

    वाळूवरून पाउल हळूवार टाकत ती  चालली होती. सगळीकडेच एक प्रकारची स्तब्धता होती. मध्येच एखादा वाळूचा खडा उडत होता. तळ्याच मनी स्तब्ध होत. झाडांची सळसळ फक्त वातावरणाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. तिला सगळ गळ्यापर्यंत भरून आल होत. विचार करता करता ती काठावर कधी बसली तीच  तिलाच कळल नाही. एकटेपणाच भय एकदा गेलं ना कि मग मृत्युचीही भीती वाटत नाही. हळूच एक खडा तिने पाण्यात टाकला.
    खडा पटकन खाली गेलं. त्याच अस्तित्वच मिटून गेल. सभोवताली पाण्याची वलय उठली आणि दूर काठापर्यंत जाऊन ती हि पाण्यात परत मिसळून  गेली.
    माणसाच्या आयुष्यात लोकही असेच येतात नाही का?तिच मन म्हणत होत. येतात आणि वलयाप्रमाणे नाहीसे होतात. पण आपण मात्र खडयासारखे अस्तित्व हरवून बसतो. खडयाला वाटत असतं हि वलय सगळी आपल्याभोवतीच आहेत पण हळूहळू त्या खडयाची पाण्यातली खोली वाढत जाते आणि एकेक एकेक करत वलय विरत जातात. अपर वेदना होत असतात. सगळच काही नकोसं होत. अपेक्षाभंगाच दुख खरचच खूप वेदनादायक असतं. आणि आपण एकटे आहोत हि भावना जेंव्हा वाढत जाते तेव्हा मग जगण नकोस होत. एक कोणी तरी हव असतं अगदी आपल, घट्ट धरून ठेवण्याजोग. कुणाच्या तरी खांद्याचा आधार हवा असतो, अश्रू धाल्न्यासाठी. कुणाचा तरी हात हवा असतो आपल्याला समर्थपणे पेलण्यासाठी.
  कधीतरी या सगळ्या अवस्थांमधून ती गेली होती. वलयाना धरून ठेवायचा प्रयत्न करतानाच सगळेच दूर गेल्यावर ती हताश होत होती. सगळ्या वेदना कशा अजूनही ताज्या होत्या. टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईचा मृत्यू, त्या आधीची बालिश अजाण नसलेली ती अचानक प्रौढ झाली. घरातले सगळे संदर्भ बदलले. काळाबरोबर आणखीनच बदलत गेले. एक परकेपणाची जाणीव झाली. एक एक करत वलय दूर गेली आणि मग वलय दूर जाण्याची चढाओढच चालू झाली. सगळ्यात जवळच वलय पण दूर दूर निघून गेल. आधाराला कुणीच नाही. काहीतरी होण्याची जिद्द मावळायला लागली अशात परत एक आशेचा किरण उगवला. कुठल्याही नवीन experiment
    ला ती घाबरत होती. पण तो आला आणि तिच्या आयुष्यात बदल घडले. त्याला आपोआप सगळ काही समजायचं आणि मग तिच जगण सोप झाल. ती भराभर यशाची शिखर चढत गेली. एक आत्मविश्वास आला. तुम्ही कोणीही नसताना तू कुणी तरी आहेस हे सांगणारे कुठलेही शब्द चालतात. त्याने नेमक तेच केल. सुरुवातीला तिच्या दुखांच्या खपल्या निघायच्या आणि ती कावरीबावरी व्हायची. असह्य झाल कि खूप रडायची. भावनांचा आवेग त्याला समजायचा आणि मग तो चं पैकी त्या अश्रुना बंध घालायचा. त्यांच्या मधलं नात  कोणतं  हे तिन कधीच शोधायचा प्रयत्न नाही केला. तो कुठेही असला तरी तो नक्की कुठेतरी आहे हे तिला माहित होत. सगळ्यांनी सोबत नाकारल्यावर तो आला तिचा हात धरला आणि समर्थपणे पेलत तिला दूरवर घेऊन गेलं.जिथं तिला सापडलं जगण्याच खर मर्म.

आणि आज तिला अचानक कळल कि त्याच लग्न ठरलं. त्याला आता कोणी तरी तिच्यापासून दूर नेणार. तिने त्याला कधी च प्रियकर नव्हत मानल. त्या नजरेतून कधी च नव्हत पाहिलं पण त्याच्या इतका आधार आजपर्यंत कोणीच तिला दिला नव्हता. त्यान जगण्याची जी दिशा दाखवली ती अनोखी होती. ती स्वतच्या पायावर खंबीरपणे उभी राहिली होती. मानेनी हि ती बरीच खंबीर आता झाली होती आणि वलयांची सवय तिला अपरिचित नव्हती. हे हि वलय आपल्यापासून लांब जात आहे यामुळे भावनेच्या धबधब्यात ती आता वाहून जात नव्हती पण त्या सगळ्या आठवणीतून दोन आश्रू मात्र पटकन तिच्या डोळ्यात आले.
कोणतंच वलयखाद्याच्या हातात नसत. त्याने फक्त आपल्या मार्गाने चालायचं असतं. ती उठली आणि ऑफिसच्या दिशेने निर्धान्राने वाटचाल करू लागली