गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

वादळ

मनातलं वादळ पायाने शमवण्यासाठी ती बाहेर पडली खरी. पण ती कुठे चालली आहे, कशासाठी चालत आहे तिचा तिलाच  कळत नव्हत. वाट, मन सगळंच अंधारात हरवलं होत.
इतक्या सुंदर निसर्ग रम्य ठिकाणी येऊन ही  तिला त्याचा आनंद घेता येत नव्हता. आपल्याच विचारांमध्ये हरवून ती कधी समुद्रावर पोचली तिला तिचही कळल नाही. त्याची आठवण मनाला सारखी स्पर्श करून जात होती. इथे तो आज असायला हवा होता.
तो का नाही फोन उचलत आहे, का तिच्या कुठल्याच SMS ला उत्तर नाही पाठवत हे अगदी बुद्धीच्या पलीकडच होत. काय चालल आहे त्याच्या मनात? काय वाटत आहे त्याला? त्याला माझ्यापासून दूर जायचा आहे का? मग तो मला का नाही हे स्पष्ट सांगून टाकत? ते जास्त बर नाही का? असा दोघांनी हि अधांतरी कुठे तरी तरंगत राहायचं, काहीतरी निष्कर्ष काढत रहायचे, स्वतःच मनावरची खपली काढायची, स्वतःच त्यावर मलमपट्टी करायची, सारख स्वतःला स्वतःच्या ताब्यात ठेवायचं या सगळ्याचा खूप कंटाळा आला.
माझी काळजी घ्यायला कोणी तरी माझं हवं, अस तिला अलीकडे फार वाटायला लागल होत. अनेक वर्षांनी तो तिला या रुपात भेटला आणि ती तिचं सर्वस्व त्याला देऊन बसली. या आयुष्याच्या वळणावर कोणी तरी भेटेल अस तिला कधीच वाटलं नव्हतं. मुलं आपापल्या वाटेला लागली आणि ती जास्तच एकटी पडली. उमेदीची अनेक वर्ष एकटीच काढलेली असली तरी तेव्हा अनेक उदयोग असायचे.  ऑफीस,नाटकात काम, गाण, लिखाण, मुलांचे व्याप- एक कि दोन! त्या उमेदीच्या काळात अनेक पुरुष आयुष्यात आले.  वेगवेगळ्या रुपात. कधी लेबल असलेली कधी लेबल नसलेली नाती. कधी अट्टाहासाने तिने काहीना दूर लोटलं तर बर्याच  जणांनी तिला.
भावनांचं ओझ पाठीशी टाकून आपण चालत राहिलो. कधीच कोणाकडे तक्रार नाही केली एकट असण्याची. मुलांकडे ही नाही. त्यांना आपण एकट्यानेच वाढवल याची हि कधी जाणीव नाही करून दिली. आलेला प्रत्येक दिवसा नव्याने साजरा केला. मग आता हि घुसमट का? काय हव आहे मला? एक आधार, एक मायेचा स्पर्श, एक प्रेमाची उब? माझ म्हणता येईल असं एक माझ माणूस ? पण त्याला मी तेवढी हक्काची, त्याची वाटते का? त्याला खरच माझ्या बद्दल काही वाटत?
विचार करत करत ती वाळूवर बसली. समुद्राच्या लाटा कधी जवळ येऊन तिला स्पर्श करत होत्या तर कधी लांबूनच परतत होत्या. त्याचा मनातही अशाच  लाटा येत असाव्यात का?
त्याच्या   मनाचं  अस प्रतिबिंब पाहून  ती हरखून  गेली  आणि  त्याच्या जवळ जाण्यासाठी अजून थोडी समुद्रात चालत गेली आणि मग तिथे आत जाऊन तिने परत एकदा समाधी लावली . त्याच्या  जवळ असण्याचं  एक अद्भुत समाधान तिच्या चेहर्यावर विलसत राहीलं .

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

अस्तित्व

आयुष्यातले दिवसच्या दिवस रिकामे जातात. मी वाट पहात रहाते. कोणीतरी येईल, कोणीतरी फोन करेल, कोणीतरी माझ्या SMS ला उत्तर देईल. पण असं काहीच होत नाही. दिवस संपतो, संध्याकाळ होते. मनावर काजळी चढायला लागते, संध्याकाळ हळूहळू मनात शिरायला लागते. मन काहूरत. तुझ्याकडे सगळ ठीक असेल ना असं वाटायला लागतं. पण तुझ्याकडून उत्तराची वाट पहाण्यापलीकडे माझ्या काहीच हातात नसतं. कसं सांगू कसं असतं माझं हे एकटेपण? रितेपण सांगताना शब्द हि रिते होऊन जातात. उरतो मनात भावनांचा शून्यपणा, अंतरात एक खोल दाट पोकळी, आंतडयाच  पिळवटण आणि ह्रीदयाच मूक रडण. या सगळ्यांची समजूत घालता घालता मी थकून जाते. त्यांना सांगते मी शेवटी कि हे सगळं तू माझ्याबरोबर सतत असतोस म्हणूनच होत, तुझं माझ्यातलं जे अस्तित्व आहे त्याचच हे प्रकटीकरण आहे. या सगळ्यांची मी मग अश्रुनी समजूत घालते.एकटेपणाचच पांघरूण घेऊन रात्र हळूच मनात शिरते आणि या सगळ्यांना जोजवून झोपवते. तू उद्या नक्की येशील अस सांगितल्यावर ते सगळे शांत होतात आणि मग सकाळची स्वप्न मनात ठेवून तुझ्या आठवणींच्या कुशीत शिरून झोपून जातात.

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

तुझा वाढदिवस

आज तुझा वाढदिवस. सलग नऊ वर्षे मी तुझ्याशिवाय तुझा वाढदिवस साजरा करते मनांतल्या मनात. शेवटचा एकत्र साजरा केलेला वाढदिवस लक्षात राहावा म्हणून कदाचित मी तुला
surprise  भेट दिली असेल. एरवी ते तुला आवडायचं नाही पण तुला पाहिजे होत तेच दिल्यामुळे तू खुश झालास. तोच झब्बा आता मी किती तरी वेळा घालते ते क्षण परत परत आठवण्यासाठी.आपल्या सहवासाच्या सोनेरी क्षणांची आठवण किती तरी वेळा मनात दाटते आणि मग मी सैरभैर होऊन जाते. तुझं माझं नातं कुठल्याही शब्दांच्या पलिकडचं आहे. ते काळाबरोबर माझ्यापासून दूर गेलेलं असलं तरी ते घालवलेले सगळे क्षण मला जसेच्या तसे लख्ख आठवतात अगदी कालच घडल्यासारखे. तू आता कुठे आहेस, तुला आम्ही दिसतो का? लोक जातात म्हणजे कुठे जातात मला माहित नाही पण मला माझ्यामध्ये तुझ अस्तित्व जाणवत. आणि म्हणूनच तुझा वाढदिवस साजरा करते मी मनांतल्या मनात. तू जिथे कुठे असशील तिथे आनंदाने रहावास. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही त्यामुळे आपण कधी कुठे परत भेटू का मला माहित नाही. तुझ्या बरोबर घालवलेले सगळे क्षण मात्र मी जाईपर्यंत माझ्याबरोबर रहातील.

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

झंझावात

एक झंझावात आला आणि तिच आयुष्य पूर्ण उलट्सुलट होऊन गेल.त्याचा पूर्ण स्पर्श पण नाही झाला तरिही तिच्या आयुष्यात उलट सुलट बदल झाले. त्याच्याबद्दलचे विचार, त्याच्यावरचे प्रेम कधीच शब्दात व्यक्त करता आल नाही किंवा करताही येणार नाही. पण त्या प्रेमाची अनुभूती एकदम वेगळी होती. सुखाबरोबर अमाप दुःख होत, त्याच्यापासून सतत लांब रहाण्याच शाप होता. तो दिसणही दुर्मिळ होत. एवढच नव्हे तर तिच अस्तित्वच त्याला त्याच्या आयुष्यात  न को
होत.जिथे मनाने नाही  गुंतल पाहिजे अशा ठिकाणी ती गुंतली होती.या भावना, हे विचार कुठेही मोकळं करण्याच तिला स्वातंत्र्य नव्ह्तं. तिला त्याचा सहवास पाहिजे होता असही नव्ह्त. आपल अस्तित्व मान्य असावं एवढच म्हणणं होत.
तिला त्याची  doormat ची वागणूक मान्य नव्ह्ती. तिचा आत्मसन्मान दुखावला जात होता. आपण याचा इतका विचार करत असताना हा आपल्याला त्याच्या जवळहि फिरकू देत नाही याचं दुःख सर्वात जास्त होतं. या मनावर कशी फुंकर घालायची, त्याला हे सगळं कसं समजावून सांगायचं काहीच कळत नव्हतं. तिला कळून चुकलं - She is the only one who has to deal with it. Nobody will help and nobody can help.
तिने सांगितलं स्वतःला -मग तो जवळ नाही आला, त्याला नसेल तसं करायचं याला तू काहि  नाही करू शकणार. तुझं प्रेम, तुझं वाटणं तरी तुझ्याबरोबर आहे ना. ते तुझ्यापासून कोणीच नाही हिरावून घेणार. तो सध्दा नाही. जग त्या प्रेमाबरोबर. अजून independent हो. त्या प्रेमाचं शिंपण कर मनावर आणि ताजीतवानी होऊन जग. तुझं प्रेम आणि तुझं जगणं या दोन्ही खरया गोष्टी आहेत हेच सत्य आहे. ते स्वीकार आणि पुढे जा.

सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

माणस

आधी लिहिलेलं तिचंच वाक्य तिने अनेक वर्षांनी वाचल  'तिला वाटल आपण फक्त आयुष्यातले टप्पेच जपून ठेवले आहेत.' कुठल्या विचारांमध्ये हे वाक्य लिहिलेलं असावं काय माहित? हो आपलं आयुष्य कसं असावं, आपल्या आयुष्यात काय असावं आणि काय असू नये याचा तिने कधीच विचार केला नव्हता, हे खर आहे. कदाचित टप्पे हि लक्षात ठेवले असतील पण तिचा लढा हा सर्वस्वी तिचा होता. तो तिची तिच लढली. तिच्या priorities तिने नीट समजावून घेतल्या. अनेक टप्प्यांवर अनेक माणसे सोडून गेली ती माणस आपण नाही विसरलो. खर तर या माणसांच्या सहवासातून आपण अजून घडलो, उमललो, फुललो, बहरलो हे तिला कळल आणि इतक्या वर्षांनीही तिला इतका आनंद झाला.
प्रत्येक प्रसंगाला कणखरपणे सामोरी जा हे सांगणारे तिचे वडील, हे संगव्णती आई, कर्तुत्वाचा मोठा आलेख पुढे ठेवणारा तिचा भाऊ, तिला उत्तमोत्तम वाचायला देणारी तिची बहिण. कला संगीत साहित्य यांची आवड न्क्लत्प्ने जोपासणार्या तिच्या मैत्रिणी आणि त्यांच्यामुळे घडत गेलेली ती, उत्तम संस्कार करणारे तिचे शिक्षक, कवितेची ओळख घडवून देणारा आणि तिच्या प्रत्येक पहिल्या कवितेचा वाचक असलेला तिचा मित्र, मुलगा देखणा असू शकतो आणि त्याच्याकडे कसं आकर्षित व्हायचं हे सांगणारा तिचा प्रियकर, शिक्षणात रस घेऊनही बाकीच्या अनेक गोष्टी करत शिक्षण संपवणारे तिचे अनेक मित्रमैत्रिणी, उत्तम करिअर करत बाकीच्या आवडी सहजतेने जपणारा काही प्रसंगी हळूवार तर काही प्रसंगी चिडणारा तिचा नवरा. तिला तिची जागा योग्यपणे दाखवून कुठे मार्गक्रमण करावी हे शिकवणारा तिचा गुरु. तिला काय संज्ञाच आहे ते न सांगताच समजणारी तिची मैत्रीण . काय काय वाचावं,  काय काय  एऐकाव आणि काय काय टिपाव हे सांगणारे तिचे मित्रमैत्रिणी, भाऊ सखे आणि जिवलग. परिस्थितीवर मात करून आयुष्य सहजतेन जगायला शिकवणारी सासू. असे कितीतरी लोकं ज्यांच्यामुळे ती घडली, फुलली आणि फुलात राहिली. नुसते टप्पे नाही तर हि माणसहि आपण लक्षात ठेवली आहेतच की!

टप्पे

आजूबाजूच्या व्यक्ती आणि त्यांची आयुष्य. ध्येयासाठी, स्वतच्या समाधानासाठी झटणारी लोकं. यांना आयुष्यात नक्की काय हव असेल याचा ती विचार करत होती.
थोडीशी हळूवार, बरीचशी practical आणि अजून कितीतरी न उमगलेली स्वाती, बरीचशी अवखळ पण  तितकीच विचारी असलेली पल्लवी, हिला आयुष्य नक्कीच उमगल  आहे आशी वाटणारी शांत मंद तेवणारी दीपिका, स्वतःला काय हव आहे हे माहित असणारा आणि सगळ्यांशी खेळीमेळीने वागणारा पण अजूनही तितकाच  reserve असणारा संदीप, स्वतच्या छदालाच  व्यवसाय बनवून त्यात झोकून देणारा तिचा  मित्र, फक्त कामापुरताच संबंध ठेवणारे पूर्णपणे professional असलेले, स्वतःच्याच मस्तीत जगणारे तिचे सहकारी! प्रत्येक जण अजिबात मोजून मापून दिलेलं आयुष्य जगत नव्हता, चौकटीतल तर नाहीच नाही. या प्रत्येकाला जगण्याच ध्येयं माहित होत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याचं जगण सोप सुटसुटीत आणि छान बनवलं होत. तिला वाटल त्यांच्याही आयुष्यात problems असतीलच ना? पण म्हणून काय ते सतत रडत आहेत? जगण्याचा समरसून आनंद घेणारी तिची जिवलग मैत्रीण! तिला मनाशीच हसू आल. किती सुंदर आयुष्य आहे तिचं !
तिला आठवले स्वतच्या जगण्याचे टप्पे - वेवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगातून आणि वेगवेगळ्या माणसांबरोबर घालवलेल आयुष्यं. तिला वाटलं आजही आपल्याला आयुष्याचा अर्थ कळलाच नाही. तिला वाटल आपण फक्त आयुष्यातले टप्पेच जपून ठेवले आहेत.

शनिवार, ३ सप्टेंबर, २०११

वलय

    वाळूवरून पाउल हळूवार टाकत ती  चालली होती. सगळीकडेच एक प्रकारची स्तब्धता होती. मध्येच एखादा वाळूचा खडा उडत होता. तळ्याच मनी स्तब्ध होत. झाडांची सळसळ फक्त वातावरणाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. तिला सगळ गळ्यापर्यंत भरून आल होत. विचार करता करता ती काठावर कधी बसली तीच  तिलाच कळल नाही. एकटेपणाच भय एकदा गेलं ना कि मग मृत्युचीही भीती वाटत नाही. हळूच एक खडा तिने पाण्यात टाकला.
    खडा पटकन खाली गेलं. त्याच अस्तित्वच मिटून गेल. सभोवताली पाण्याची वलय उठली आणि दूर काठापर्यंत जाऊन ती हि पाण्यात परत मिसळून  गेली.
    माणसाच्या आयुष्यात लोकही असेच येतात नाही का?तिच मन म्हणत होत. येतात आणि वलयाप्रमाणे नाहीसे होतात. पण आपण मात्र खडयासारखे अस्तित्व हरवून बसतो. खडयाला वाटत असतं हि वलय सगळी आपल्याभोवतीच आहेत पण हळूहळू त्या खडयाची पाण्यातली खोली वाढत जाते आणि एकेक एकेक करत वलय विरत जातात. अपर वेदना होत असतात. सगळच काही नकोसं होत. अपेक्षाभंगाच दुख खरचच खूप वेदनादायक असतं. आणि आपण एकटे आहोत हि भावना जेंव्हा वाढत जाते तेव्हा मग जगण नकोस होत. एक कोणी तरी हव असतं अगदी आपल, घट्ट धरून ठेवण्याजोग. कुणाच्या तरी खांद्याचा आधार हवा असतो, अश्रू धाल्न्यासाठी. कुणाचा तरी हात हवा असतो आपल्याला समर्थपणे पेलण्यासाठी.
  कधीतरी या सगळ्या अवस्थांमधून ती गेली होती. वलयाना धरून ठेवायचा प्रयत्न करतानाच सगळेच दूर गेल्यावर ती हताश होत होती. सगळ्या वेदना कशा अजूनही ताज्या होत्या. टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईचा मृत्यू, त्या आधीची बालिश अजाण नसलेली ती अचानक प्रौढ झाली. घरातले सगळे संदर्भ बदलले. काळाबरोबर आणखीनच बदलत गेले. एक परकेपणाची जाणीव झाली. एक एक करत वलय दूर गेली आणि मग वलय दूर जाण्याची चढाओढच चालू झाली. सगळ्यात जवळच वलय पण दूर दूर निघून गेल. आधाराला कुणीच नाही. काहीतरी होण्याची जिद्द मावळायला लागली अशात परत एक आशेचा किरण उगवला. कुठल्याही नवीन experiment
    ला ती घाबरत होती. पण तो आला आणि तिच्या आयुष्यात बदल घडले. त्याला आपोआप सगळ काही समजायचं आणि मग तिच जगण सोप झाल. ती भराभर यशाची शिखर चढत गेली. एक आत्मविश्वास आला. तुम्ही कोणीही नसताना तू कुणी तरी आहेस हे सांगणारे कुठलेही शब्द चालतात. त्याने नेमक तेच केल. सुरुवातीला तिच्या दुखांच्या खपल्या निघायच्या आणि ती कावरीबावरी व्हायची. असह्य झाल कि खूप रडायची. भावनांचा आवेग त्याला समजायचा आणि मग तो चं पैकी त्या अश्रुना बंध घालायचा. त्यांच्या मधलं नात  कोणतं  हे तिन कधीच शोधायचा प्रयत्न नाही केला. तो कुठेही असला तरी तो नक्की कुठेतरी आहे हे तिला माहित होत. सगळ्यांनी सोबत नाकारल्यावर तो आला तिचा हात धरला आणि समर्थपणे पेलत तिला दूरवर घेऊन गेलं.जिथं तिला सापडलं जगण्याच खर मर्म.

आणि आज तिला अचानक कळल कि त्याच लग्न ठरलं. त्याला आता कोणी तरी तिच्यापासून दूर नेणार. तिने त्याला कधी च प्रियकर नव्हत मानल. त्या नजरेतून कधी च नव्हत पाहिलं पण त्याच्या इतका आधार आजपर्यंत कोणीच तिला दिला नव्हता. त्यान जगण्याची जी दिशा दाखवली ती अनोखी होती. ती स्वतच्या पायावर खंबीरपणे उभी राहिली होती. मानेनी हि ती बरीच खंबीर आता झाली होती आणि वलयांची सवय तिला अपरिचित नव्हती. हे हि वलय आपल्यापासून लांब जात आहे यामुळे भावनेच्या धबधब्यात ती आता वाहून जात नव्हती पण त्या सगळ्या आठवणीतून दोन आश्रू मात्र पटकन तिच्या डोळ्यात आले.
कोणतंच वलयखाद्याच्या हातात नसत. त्याने फक्त आपल्या मार्गाने चालायचं असतं. ती उठली आणि ऑफिसच्या दिशेने निर्धान्राने वाटचाल करू लागली

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

संध्याकाळ

संध्याकाळची हलकीशी तिरीप दाराशी आली आणि तिला कळल संध्याकाळ हळूहळू येते आहे दाराशी. दिवस संपत आला. हलकेच उठून झोक्यावर बसत तिने खिडकीच्या बाहेर पाहिलं, हलक उन आणि सुर्यास्तामुळे झाड पण वेगळीच भासत होती. तिने पटकन स्वतःसाठी चहाच आधण चढवल,  आलं किसून टाकल आणि चहा उकळेपर्यंत स्वयंपाकघराच्या खिडकीतून पक्ष्यांची लगबग ऐकत राहिली. मस्त वाफाळणारा चहा कपात ओतून तिने पटकन दार उघडले आणि समोरच्या पायरीवर आपली बैठक जमवली. तिचा हा रोजचा आवडता उद्योग. दिवसभर थकलेल्या या पक्षी, झाड, वेली यांबरोबर सूर्यास्त अनुभवण हि कशी वेगळी मजा आहे हे त्यान तिला शिकवलं. घरासमोरच अंगण एकदम वेगळच भासायला लागत. अनेक पक्ष्यांचे येणारे वेगवेगळे आवाज, त्यांना साथ देणारी पानांची सळसळ, या सगळ्यात कधी तरी मध्येच येणारी निस्तब्ध्ता आणि अशा वेळेला जाणवणारी फक्त वारयाची झुळूक. त्या बरोबर येणारा असंख्य फुलांचा घमघमात. स्वतःसाठी तो असा खूप वेळा वेळ शोधून काढायचा आणि असे छोटे छोटे क्षण तिच्याबरोबर उत्कटपणे घालवायचा. असा सूर्यास्त बघायला मग शब्द लागायचे नाहीत. एकमेकांबरोबर अस अनुभवण हा च एक सोहळा होऊन जायचा. तिला आठवला त्याचा फोटो पाठून काढलेला - प्रकाशाच्या समोर उभा असलेला ..किती छान दिसतो हा असा. मावळत्या सूर्याला सलामी देत असतानाचा.
त्याच्यावर आपलं अजून पण तेवढच प्रेम आहे. तोच तर येतो भेटीला या प्रत्येक संध्याकालेतून. या जाणीवेने ती मोहरून गेली. त्यची अशी नव्याने झालेली ओळख तिला आवडली.

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

Jigsaw Puzzle

आयुष्य मला समोर चित्र नसलेल्या jigsaw puzzle सारख वाटत. आपण माहित नसलेला एक एक भाग जोडत जातो. जर ते दोन बाग जोडले जाणार असतील तर जुळतात आणि मग त्या दोन भागांपुरत तरी अगदी अंधुक  चित्र स्पष्ट होतं. जन्मल्यापासून कळत्या वयात जाण्यापूर्वी आपण असेच माहीत नसलेले, कळत नसलेले संदर्भ, भाग जोडत जातो.  कळत्या वयात आणि आयुष्याच्या मध्यावर काही भाग आपण समजून उमजून जोडतो तर काही भाग आपल्याही नकळत जोडले जातात. काही जण चित्र पूर्ण होण्याआधीच डाव उधळून निघून जातात तर काहीना पूर्ण चित्र कळल्यानंतरही अगदी छोटासा भाग कुठे हरवला आहे हे शोधत जगाव लागत. काहीना त्यांच्या आयुष्याची मोठी मोठी कोडी भराभर उमजतात तर काहीना बराच वेळ लागतो. चित्र पूर्ण करण्याचा ज्याची त्याची वेळ मात्र पूर्ण वेगळी असते. चित्राचे भाग काही अंशी सारखे असले  तरीही पूर्ण होणार प्रत्येकाचं चित्र मात्र बरंच वेगळ असतं.

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

डोळ्यांच्या पापण्या  मिटल्या आणि आठवणी डोळ्यात  साठल्या. ह्रिदयाचा कप्पा उघडून आणखी आठवणी बाहेर पडल्या. त्यांचा एकमेकांशी संवाद होऊ लागला. अशावेळी  माझी हि झोप उडून जाते आणि मग मी हि त्या आठवणीशी अजून संवाद साधते. मन हि मग काबूत रहात नाही. कधी हि आठवण उलगड तर कधी त्या आठवणीच्या खोलात शीर अस काहीतरी चालू होत. सगळ्या शरीराचा आणि मनाचा झोपेसाठी झगडा चालू होतो. आठवणीचे कसले कसले संदर्भ आठवायला लागतात. काही आठवणी स्पर्श करून ओलचिंब करतात तर काही थोड्या दुरून च लांब निघून जातात. त्यानाही तुझ्या सारखीच माझ्या जवळ येऊन गुंतून पडायची भीती वाटते बहुदा. काही आठवणी जणू पद्मासन घालून ध्यानालाच बसतात. तर काही आठवणी हलक्या हलक्या लांब निघून जातात. तुझ्या कुठल्याच आठवणी कधीच कुठेच जात नाहीत. त्या सगळ्या माझ्या नसानसात भिनल्या आहेत. त्या वेगळ्या आठवत नाहीत त्या सतत माझ्या आजूबाजूला रुंजी घालत असतात. तुझा रहाण आणि भेटण भलेही तात्पुरत होत तुझ्यासाठी, पण माझ्या साठी ती खूप मोठी ठेव आहे. खूप मौल्यवान आहे ते सगळ माझ्यासाठी. माणसाला मोह सुटत नाही म्हणतात तस मला अजूनही तुला भेटावस वाटत आणखी थोड्या आठवणी ओंजळीत भरून घ्याव्याश्या वाटतात. त्यांचा सुगंध नसानसात भरून तृप्त व्हाव असही वाटत. पण भेटत नसल्यामुळे जी अनामिक हुरहूर दाटते ती तुझ्या  आठवणींच्या मात्र अजून जवळ नेते हे खर आहे.

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

मन दुखी आहे कि आनंदी कस ठरवायचं?
मन गुंतलं आहे कि सुटल कस बघायचं ?
कस आवरायचं मनाला परत परत?
कस सावरायचं स्वतःला परत परत?
कोसळणारया धबधब्याला पाणी आवरून कोसळणं
कस शिकवायचं?
भिजणारया गात्राला कोरड राहून भिजायला
कस सांगायच?
प्रेम घेऊन वाहणारया नदीला प्रेम  आटवायला
कस सांगायच?
फुललेल्या फुलाला सुगंध न देता दरवळायला
कस सांगायच?
कोसळणं हा झरयाचा धर्म आहे, भिजण हे गात्राचं  मागणं आहे.
वाहणं हि नदीची प्रथा आहे तर दरवळणं हा फुलाचा नियम आहे.
निसर्गाच्या विरुद्ध काहीच होत नाही आणि मी हि निसर्गाचाच एक भाग आहे.
काय सुरु झालं काय संपल
काय चालू आहे याचा कसा हिशेब मांडायचा ?
कमावलेले क्षण किती गमावलेले क्षण किती
याचा कसा शोध लावायचा ?
शेवटच्या क्षणापर्यंत माणूस कसा हे कळत नाही
तर माणसाशी कस वागायचं याचा कसा थांग लावायचा?
    वादळ रात्र दाटते मनात,तुझी आठवण येऊन.वाट शोधते मी त्या वादळात तुझ्यापर्यंत पोचण्याची. ती वादळवाट तुझ्या पर्यंत पोहोचवेल  का मला हे माही नसतं पण तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या इच्छेने मी चालत  रहाते. तुला मनात साठवून प्रवासाला सुरुवात करते आणि वाटेत सगळीकडे तूच भेटत रहातोस. कधी सरींच्या रुपात, कधी वाऱ्याचा झुळूकीत, कधी पानांच्या सळसळयातून, कधी चंद्र्म्यातून . तझा असा होणारा स्पर्श मला मोहून टाकतो. मी थांबते वाटत पोचले  मी तुझ्यापर्यंत. पण अरे ते सगळे भासच असतात. वाट पुढे निघून गेलेली असते. केवढी धांदल उडते माझी तिथवर पोचताना. परत प्रवास चालू होतो. मध्येच तुझा वाक्य आठवत

Life is journey madam not destination

    हं म्हणून तर तुझ्या वाटेवर चालत रहाते तुला शोधत.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११

आठवतोस तू मला अजून तू  जेव्हां मी प्रथम तुला पाहिलं. असा सिंहासारखा डौलात स्वत:च्याच मस्तीत चालत आलास. उगाच नाही म्हणत मी तू तुझा खूप आवडता आहेस म्हणून. तू स्वतः वर खूप खूप प्रेम करतोस. स्वतःला खूप जपतोस. स्वतःला त्रास होईल असा काही वागत नाहीस. असं दाखवून तरी देतोस हा. पण मला माहीत आहे. तुला ही त्रास होतो. तू स्वतःला अलिप्त ठेवतोस आणि दाखवतोस कि मला काहीच फरक पडत नाही. पण मला जेव्हा त्रास होतो तो पोचतो तुझ्यापर्यंत. मी आता तुला खूप चांगल  ओळखायला लागले आहे रे. मला काय हव आहे तुझ्याकडून ? चार प्रेमळ शब्द. कधी तरी कशी आहेस ग? असा एखादा फोन. बस्स! तू मला काय देणार आणि मी तुला?
मला आपलं नातं या सगळ्यांच्या पलीकडे वाटत. आ हा मी काय नात आहे शोधत नाही आहे त्याला लेबलं हि नाही लावत आहे. पण कुठेतरी मनाच्या आत  तू फक्त माझा असतोस. फक्त माझा स्वतःचा. तिथे मी तुझ्यावर प्रेम करते, कधी तुझ्याशी भांडते , कधी तुला तुझ्या मनातलं सगळं विचारते तर कधी माझ्या मनातलं सगळं सांगते. तुझ्याबरोबर लांब फिरायला जाते तर कधी long drive ला. मी तुझ्याशी खूप खूप बोलते. माझं आणि तुझं एकटेपण घालवते. हे नातं मला असंच जपायचं आहे. घट्ट धरून ठेवायचं आहे. कुठल्याही अपेक्षांचे स्पर्श त्या नात्याला होऊ द्यायचे नाहीत.

गुरुवार, २८ जुलै, २०११

My School mates

I am going to meet few of my school mates exactly after 20 years! Whooooa... While the get together day is approaching fast, I am getting so many mixed feelings in my mind.
I had my own girly group in the school days with all dashing girls who used to be in their own world, the studious approach, a very positive mind to face the daily problems, very aggressive and not so friendly with other groups. We used to feel we are the BEST. We always used to debate on different issues - right from politics to any serial we used to watch. We never cared about our dressing, our looks, our heights, our complexion!  We used to worry about elocution competition, about science exhibition, about essay writing and reading the books. We used to do mimicry of our teachers. Finish the lunch as early as possible and utilize the big break only with the different physical activities. Well we started talking about boys in the typical age but not in a good spirit. We always use to take them as our rivals. Though all of us used to feel the attraction at the teen age but we never accepted that fact. We never imagined or talked lives after getting departed from each other. And we all are still very well connected. Now we can't spend every day together, or talk to each other or meet each other but we are very well connected. We are meeting boys who used to be our rivals. Now the things are changed over the years. Every one is settled in his/her own life, got married, have kids. Busy in shaping their lives and their kids lives. What will be the feeling when we will meet? I know we will cherish our school days. We will remember our teachers. But I would like to talk to them about social cause. if we can come up together and give back something to our town and the rural area around us. To the school who has given us the value education.
Well though we are not of that age what we used to be in school, though some of us have become fat or become bald I guess the "being together" feeling is still same. The values which we have got from our small town place are same.
What does inspire me? Women who are at the top? Men who travel a lot and earn money? people who are at the top most position? Well all these things attract me - don't inspire me
I get inspired by the people who make right decision at the right time. The people who have passion for some thing. The people who know the correct way to grow in their career/life. The people who know their priorities. The people who love their lives.
The passion for something takes a man to a long way. I think right decision/passion finally give a great satisfaction and happiness.

बुधवार, २७ जुलै, २०११

First attempt

How does it feel? When some person suddenly walks away from you... you are engrossed with him through daily conversations ...sharing the joy and sorrow... sharing small and minute details.. with somebody.. and suddenly the somebody is disappeared, gone.... you know he is just one phone call away... you call him and talk to him and then suddenly you come to know - No this person has changed over the period of time.. just over few months... you try to analyze - what exactly has changed? what and how it went wrong? why suddenly there is a bridge, a communication gap.....you become desperate to find out. but you don't get any answer. You try to keep yourself composed but you are unable to do so...
and then I watched Turning 30....a movie about 3 women who are close friends... two are single and 1 is married.... on the verge of becoming 30 the lady gets dumped by her boy friend... she becomes panic.. sloshes herself, goes with one night stand...  fails to become successful in her career apart from trying hard and becomes lonely on personal front.. totally collapsed and the suddenly through all these odds she finds her own way... to become happy....
Well all above things mentioned have always given the happiness to me... talking to my friend.. thinking of him..... sharing the details with him.... not sure about the other person/my friend whether he was happy or whether he was getting bothered because of my continuous presence in his life....
 so I decided to pursue happiness.. on my own way... I need to find the inner strength again... need to start my own journey, the way I did in the past... I need to sort my own life - my own way... nobody will help me to sort the things. I want to find happiness. I would like to tell me that I am beautiful. I need to tell myself that I am strong enough to fight the odds and come out gracefully.

बुधवार, २० जुलै, २०११

समांतर आयुष्य

प्रत्येक माणसाबरोबर समांतर आयुष्य  जगावं म्हणजे मग कुठेही धोका नाही रस्ता वळणाचा होण्याचा. त्या वाटांमध्ये हरवण्याचा. नागमोडी वळण फार त्रास देतात.
ज्यांना आयुष्यात थ्रील आवडत, ते म्हणतील चे हे कसल आयुष्यं! पण ज्याने आयुष्यात खूप धोके पचवले असतात ती व्यक्ती असच म्हणेल कि समांतर आयुष्यच बर बुवा.

गुरुवार, ७ जुलै, २०११

आनंददायी प्रवास

आनंददायी प्रवास तुझ्याबरोबरचा   माझा
एकत्र चालण्याचा हा अनोखा अनुभव  तो आला
मन रिते शब्द रिते रिते अंतर माझे
तुझ्या सोबतीने सख्या आनंदाचे झाड झाले
झाडाला त्या मग कळ्या खूप आल्या
सुगंध सहवासाचा चहूकडे पसरला
मना सुगंधी तन सुगंधी श्वास सुगंधी झाला
तुझा सहवास मग चहूकडे दरवळला

मंगळवार, २८ जून, २०११

काही क्षणी

काही क्षण असतात
खूप हळवे
मोती विखुरतात चहूकडे
मोती गोळा करायला नाही रे
मी भरलेले मोती
थोडा वेळ ओजंळीत धरणारे

काही क्षण असतात
खूप फसवे
नभ भरून पाऊस आणणारे
पावसात भिजायला नाही रे
मी भिजल्यावर
मला थोड कोरड करणारे

काही क्षण असतात
खूप रिक्त एकटे
सतत माझ्याबरोबर नाही रे
थोडा वेळ मला साथ देणारे

होशील का रे तू माझे हे सगळे क्षण?
वाटत हवास तू जवळ
प्रत्येक क्षणी नाही रे काही क्षणी 



शनिवार, २५ जून, २०११

श्वास

माझे श्वास नेहमीच असतात
तुझ्या श्वासांसाठी आतुर
दोन   श्वासांमधलं अंतर काप्तानाही
मना होत काहूर

शब्द

माझ्या अनेक शब्दांमधून
तुला खूप काही सांगायचं असतं
तू वाचत असताना तुला समजलं
का ते हळूच पहायचं असत

तूपण

तुझ्याबरोबर  रहायचं असताना
तुझ्यापासून दूर जावं लागत
तू नाहीस म्हणून
तुझ्या आठवणींवर
रहायला लागत
तुझ्या आठवणी
तुझा श्वास देतात
तुझ्या आठवणी
तुझा स्पर्श देतात
तुझ्या आठवणी
मला तुझं
तूपण देतात

मंगळवार, २१ जून, २०११

तुझीच

क्षण कोवळे  थेंब दवाचे
पानावरती सजून आले
क्षण हसरे बनुनी सूर्यकिरण ते
प्रभाती तव भेटीस आले
क्षण उल्हासले तुझ्या कटाक्षाने
सोनेरी बनून परत आले
क्षण हळवे थेंब पावसाचे
सरीवर सरीने कोसळत राहिले
थेंब चंदेरी चंद्रप्रकाशाने
न्हाउनी तव भेटीस आले
गात्रागात्रामध्ये तुज साठवून
परत माझ्या उशाशी आले
हे सारे क्षण अंतरी साठवून
हे सारे क्षण अंतरी साठवून
मी तुझीच रे तुझीच झाले

गुरुवार, १६ जून, २०११

तुझी आठवण

तुझी आठवण होणं
हे मुक्त होणं आहे
तुझी आठवण येणं
हे व्यक्त होणं आहे
तुझी आठवण हि
अंतरातील साठवण आहे
तुझी आठवण हे
हृदयाचं कंपन आहे.
तुझी आठवण तुझं जतन आहे
तुझी आठवण माझं मी पण आहे.

मन

कागदावर लिहिलेलं झरझर
पटपट माझ्या मनात शिरलं
कागद झाला कोरडा
माझं मन मात्र शब्दाने  भरलं

मी

असंच रहाव मी
अलगद पिसासारख
यावं तुझ्या मनात
आठवणीसारख
तुला नाहीच कळणार मग
तू कधी माझा झालास आणि
मी कधी तुझी झाले

इथे

इथे कोणीच नसते कोणाचे
प्रत्येक असते  एकटे
तरीही जगण्याचे अर्थ मात्र
प्रत्येकाचे वेगवेगळे
इथे प्रत्येकाच्या मनात
असते खोलवर दडलेले
तरीही व्यक्त होणे मात्र
प्रत्येकाचे वेगवेगळे

बुधवार, १५ जून, २०११

तुझ्या बरोबर असणं

तुझ्या बरोबर असणं म्हणजे शरदाच चांदणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे मोत्याच सांडणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे मोगरयाचं हासणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे दवाच शिंपणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे पहिल्या पावसात भिजणं
तुझ्या बरोबर असणं म्हणजे माझं तुझ्यात मिसळणं

मंगळवार, ७ जून, २०११

नातं

नातं  कधी असतं गहिर अथांग खोलवर नेणारं,  कधी असतं रेशमी वस्त्रासारख. कधी खूप अपेक्षापूर्ण तर कधी नीरपेक्ष.
कोण किती जवळचं आहे हे असं मोजपट्टी लावून नाही ठरवता येत. नातं कधी ठरवून जोडता नाही येत ते आपोआप घडत.
नात्याला लेबल नसतं आणि तरीही प्रत्येक नातं स्पेशल आणि जवळच असतं.

जवळ

तुझं जवळ वाटणं
सुखावह असतं
तुझं जवळ असणं
स्व्प्नदायी असतं

तू

कशा सांगू तुला माझ्या भावना
कळतील तुला त्या न सांगता?
कशा सांगू तुला तुझ्या नसण्याच्या खुणा
किती त्रास देतात मला ?

सोमवार, ३० मे, २०११

तुझ्यासाठी

गळ्यात खूप काही दाटून आलं होतं
ओठांना खूप काही सांगायचं होतं
पण शब्द ओठांना फितूर झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
डोळ्यात खूप काही दाटून आलं होतं
डोळ्याना खूप काही सांगायचं होतं
पण  अश्रू डोळ्याना फितूर झाले
आणि सांगायचे राहूनच गेले
कधीतरी डोळ्यांना आणि ओठांना मिळेल साथ
आणि मनात आलेलं सगळ सांगून टाकेन तुझ्या साठी खास

कोपरा

प्रत्येकाच्या मनात एक  कोपरा असतो. काळ, वेळ, स्थळ या कशाचाच त्याला बंधन नसत. कधी वाटेल तेव्हा त्या कोपरयात जाउन बसावं. कधी तिथून दिसतो अथांग सागर, कधी दिसतात ताडामाडाची झाडं.
कधी दिसते प्रिय व्यक्ती तर कधी दिसतात स्वतःची ध्येयं. कधी दिसते स्वतःची जन्मभूमी, तर कधी दिसते स्वतःची स्वप्नभूमी. बालपणीच्या आठवणी तिथे  जागतात, भविष्यकाळाची स्वप्न तिथे दिसतात. प्रत्यक्षात न करता येणारया गोष्टी आपण तिथे  बसून नक्की करू शकतो. प्रत्यक्षात न भेटणार्या व्यक्ती तिथे  येतात आपल्याशी गप्पा मारतात. कधी खूप एकट वाटत असेल कधी कोणाची आठवण येत असेल तर थोडा वेळ काढावा, आपल्या मनाचा कोपरा गाठावा, वाट्टेल ते करावं,स्वतःला झोकून द्याव. मन भरलं किंवा ताळ्यावर आलं की परतावं.

रविवार, २९ मे, २०११

सय

सय येते सख्या तुझी आठवणीच्या गाभारात
मंद नंददिपासमे तेवे माझिया मनात
सय येते शब्दासमवे बोलते मनात
कविता बनून भरारी घेते मोकळ्या नभात
सय होते दुख ओघळते नयनात
सय होते सुख हासते ओठात
सय होते साठवण दाटते मनात
शब्द बनून नटून  येते कवितेच्या पानात

गुरुवार, २६ मे, २०११

पहिला पाउस

पहिल्या पावसाशी प्रत्येकाचा एक नात असतं.कधी व्यक्त असत तर कधी अव्यक्त.पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर दुख वाहून जातं.पावसाच्या प्रत्येक थेंबाबरोबर सुख हसत येतं.  कोमेजणार्या फुलांना जगण्याची नवी आशा मिळते. वठलेल्या झाडाला नवी पालवी फुटते. मग माणसाला नवी उमेद का निर्माण  होऊ नये? दुख झटकून मोकळ व्हावं, हसत हसत पहिली सर अंगावर घ्यावी, पहिलं प्रेम आठवावं, आलं घातलेला मस्त चहाचा कप हातात घ्यावा, आतआणि बाहेर पाउस कोसळू द्यावा. पाउस थाबल्यानंतर स्वच्छ मनानं नव्या गोष्टीना सामोर जाव. जगणं सुंदर आहे. जगणं पाउस आहे. जगणं कोसळत्या सरी आहे.
नात्यास अपुल्या नको नाव देऊ
ते आहे जगावेगळे
प्रेमाची उधळण करूनही
बंदिस्त अपुले जगणे

एकमेकांच्या हातात हात गुंफुनी
क्षितीजाशी जाणे मनी
नजरेला नजर मिळणेही
होते दुर्मिळ क्षणी

धुक्यातून वाट शोधत
पोहोचायचं असतं एकमेकांपर्यंत
भावपूर्ण भेटींचे क्षण बाळगायचे असतात उरापर्यंत

प्रत्येक क्षणात असतो
एकमेकांच्या असतित्वाचा साक्षात्कार
वेगवेगळ जगतानाही नसतो आपपरभाव
जमत आता मलाही
एकट एकट रहाणं
एकट जगत असतानाही
तुझ्या आठवणीत रमणं
तुझ्या आठवणीचा
आता त्रास होत नाही
तुझ्या आठवणीमुळए
आता दुख होत नाही
मिळतो एक सुखद आधार
चांगल्या क्षणांचा
बळ देतात मला त्या एकट जगायला
जमत आता मलाही
एकट एकट रहाणं
एकट जगत असतानाही
तुझ्या आठवणीत रमणं
तुझ्या आठवणीचा
आता त्रास होत नाही
तुझ्या आठवणीमुळए
आता दुख होत नाही
मिळतो एक सुखद आधार
चांगल्या क्षणांचा
बळ देतात मला त्या एकट जगायला