सोमवार, ३० मे, २०११

कोपरा

प्रत्येकाच्या मनात एक  कोपरा असतो. काळ, वेळ, स्थळ या कशाचाच त्याला बंधन नसत. कधी वाटेल तेव्हा त्या कोपरयात जाउन बसावं. कधी तिथून दिसतो अथांग सागर, कधी दिसतात ताडामाडाची झाडं.
कधी दिसते प्रिय व्यक्ती तर कधी दिसतात स्वतःची ध्येयं. कधी दिसते स्वतःची जन्मभूमी, तर कधी दिसते स्वतःची स्वप्नभूमी. बालपणीच्या आठवणी तिथे  जागतात, भविष्यकाळाची स्वप्न तिथे दिसतात. प्रत्यक्षात न करता येणारया गोष्टी आपण तिथे  बसून नक्की करू शकतो. प्रत्यक्षात न भेटणार्या व्यक्ती तिथे  येतात आपल्याशी गप्पा मारतात. कधी खूप एकट वाटत असेल कधी कोणाची आठवण येत असेल तर थोडा वेळ काढावा, आपल्या मनाचा कोपरा गाठावा, वाट्टेल ते करावं,स्वतःला झोकून द्याव. मन भरलं किंवा ताळ्यावर आलं की परतावं.

२ टिप्पण्या:

  1. असे मनाचे कोपरे मिळणाऱ्या मंडळींच मला कौतुक आहे. मला लेकाचा हा कोपरा सापडताच नाही. बहुदा माझ्या मनाच्या खोलीत कोपरे नसावेत !! धरावीतल्या सारखी गोल झोपडी असावी माझा मन म्हणजे ...असलेच कुठे कोपरे तर बिलांच्या अडगळीने भरलेले असावेत ..महिन्याच्या सुरुवातीला अस कवी सारख कोपरा वगैरे काहीतरी वाटे पर्यंत क्रेडीट कार्डच बिल येउन पडत आणि कोपरा भरून जात असावा :) गंमत बाजूला राहूदे लिहिल मात्र छानच आहे. पुणेकरांना हे बर जमत !!

    उत्तर द्याहटवा