मंगळवार, ७ जून, २०११

नातं

नातं  कधी असतं गहिर अथांग खोलवर नेणारं,  कधी असतं रेशमी वस्त्रासारख. कधी खूप अपेक्षापूर्ण तर कधी नीरपेक्ष.
कोण किती जवळचं आहे हे असं मोजपट्टी लावून नाही ठरवता येत. नातं कधी ठरवून जोडता नाही येत ते आपोआप घडत.
नात्याला लेबल नसतं आणि तरीही प्रत्येक नातं स्पेशल आणि जवळच असतं.

1 टिप्पणी:

  1. आरती
    वा वा खूपच छान.यावरून मी लिहीलेल्या "नाते" का कवीतेतली काही कडवी देतो.

    सख्ख्या बहीण भावांची मने

    नेहमी आभावानेच जुळतात

    अगदी जुळ्या भावंडात सुद्धा

    तुटण्या इतके मतभेद होतात...





    कधी कधी हा रक्तबंध

    पुढच्या जन्मी प्रकट होतो

    लाखात एखाद्या व्यक्तीला तो

    अनुभव जाणवून जात असतो...



    हा बंध कळणं समजणं

    खूप खूप अवघड असतं

    अनोखा अनुभव असल्याने तो

    संपून जाण्याचं भय असतं...



    असे दुर्लभ अनुबंध नेहमी

    फार फार काळजी घेतात

    अशी रम्य नाती नेहमीच

    मन चित्त आनंदी करतात...

    उत्तर द्याहटवा