गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

तू

आठवतोस तू मला अजून तू  जेव्हां मी प्रथम तुला पाहिलं. असा सिंहासारखा डौलात स्वत:च्याच मस्तीत चालत आलास. उगाच नाही म्हणत मी तू तुझा खूप आवडता आहेस म्हणून. तू स्वतः वर खूप खूप प्रेम करतोस. स्वतःला खूप जपतोस. स्वतःला त्रास होईल असा काही वागत नाहीस. असं दाखवून तरी देतोस हा. पण मला माहीत आहे. तुला ही त्रास होतो. तू स्वतःला अलिप्त ठेवतोस आणि दाखवतोस कि मला काहीच फरक पडत नाही. पण मला जेव्हा त्रास होतो तो पोचतो तुझ्यापर्यंत. मी आता तुला खूप चांगल  ओळखायला लागले आहे रे. मला काय हव आहे तुझ्याकडून ? चार प्रेमळ शब्द. कधी तरी कशी आहेस ग? असा एखादा फोन. बस्स! तू मला काय देणार आणि मी तुला?
मला आपलं नातं या सगळ्यांच्या पलीकडे वाटत. आ हा मी काय नात आहे शोधत नाही आहे त्याला लेबलं हि नाही लावत आहे. पण कुठेतरी मनाच्या आत  तू फक्त माझा असतोस. फक्त माझा स्वतःचा. तिथे मी तुझ्यावर प्रेम करते, कधी तुझ्याशी भांडते , कधी तुला तुझ्या मनातलं सगळं विचारते तर कधी माझ्या मनातलं सगळं सांगते. तुझ्याबरोबर लांब फिरायला जाते तर कधी long drive ला. मी तुझ्याशी खूप खूप बोलते. माझं आणि तुझं एकटेपण घालवते. हे नातं मला असंच जपायचं आहे. घट्ट धरून ठेवायचं आहे. कुठल्याही अपेक्षांचे स्पर्श त्या नात्याला होऊ द्यायचे नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा