गुरुवार, १३ जुलै, २०२३

पहिली Ride

 


माधुरीने दिलेला डबा परत करायला विवेक घरी आला.

विवेक - "काकू , काकू "

माधुरी काहीच बोलायला तयार नाही .

विवेक परत जोरात ओरडला - "काकू , अहो काकू. आईने हा डबा परत दिला आहे "

काहीच उत्तर नाही बघून विवेक चक्रावला.

तेवढ्यात प्राची बाहेर आली.

प्राची –“Hi Vivek. Aai is observing silence today. तिच्या meditation मधला एक भाग आहे हा”

विवेक - "That’s what I was wondering. आणि हो हे तुझं पुस्तक पण परत करायचं होतं.

प्राची –“ काय रे इथल्या इथे यायला तू Goggle, shoes etc. घालून आला आहेस!”

विवेक - "No I am going in a library. I need to check few books”

प्राची –“ अरे माझ्याकडचं कोणतं हवं आहे का?”

विवेक मिश्किल हसत म्हणाला - " मला जे हवंय ते तुझ्याकडे नाही”

प्राची जरा घुश्यात म्हणाली –“What do you mean?”

विवेक –“chill, I need to check engineering books बाई”

प्राची –“Oh!! काय रे तू पण!!”

विवेक –“ जरा गम्मत ग! येतेस का तू पण ? पटकन bike वर जाऊन येऊ”

प्राची –“ अरे अभ्यास करते आहे, next time?”

विवेक –“ चल ग पटकन येऊ”

विवेक  बरोबर  bike ride! Woow प्राची मजा आहे तुझी असं टी स्वतः च स्वतः ला म्हणाली आणि खुश झाली . आईच्या मौन व्रताचा फायदा आहे की आज. आई मी आले ग पटकन असं म्हणून ती चपला अडकवून बाहेर पण पडली

प्राची –“Opps Vivek, I didn’t change. Give me 5min please?”

विवेक –“ अग मस्त दिसते आहेस तू जशी आहेस तशी खरंच . कशाला change करायचं ? तू जर तयार होऊन आलीस तर मला complex येईल”

प्राची –“ काहीही हा.”

आणि मनात म्हणाली  तू केवढा handsome आहेस ते फक्त मलाच माहीत आहे की काय!”

विवेकने bike ला kick मारली. प्राची मागे बसली. वाऱ्याने तिचे केस उडत होते. विवेक ला ते समोरच्या आरशातून दिसत होते.

विवेक मनात म्हणाला – “Doesn’t she know she is so simple and yet beautiful”

Library च्या parking मध्ये bike park करून दोघे पहिल्या मजल्यावर गेले. Engineering section मध्ये जाऊन विवेकने थोडा शोध घेतला पण त्याला हवं ते पुस्तक तिथे नव्हतं.

विवेक –“ प्राची चल जाऊ या नाही मला हवं ते इथे पण”

प्राची मागे वळली. विवेकच्या काळ जात एक कळ उठली . “Shit I have a crush on her”

प्राची –“ ठीक आहे चल मग” उदास होऊन प्राची म्हणाली

विवेक –“ अगं तू का उदास होते आहेस . इथे नाही मिळालं पुस्तक दुसरीकडे मिळेल”

प्राची –“ नाही रे आता लगेच घरी जावं लागेल ना”

गालातल्या  गालात हसत विवेक म्हणला-“ पण कोणाला तरी खूप अभ्यास आहे ना. कोणीतरी तयार पण नव्हतं यायला”

बापरे याला कळलं का प्राची बावरली

प्राची –“ अरे इथे जवळ एक lake आहे. एक छोटी चक्कर मारू या का?”

विवेक –“ वा वा का नाही ? मला पण जरा इथल्या जागा कळतील”

Parking मधून bike काढून प्राची सांगेल त्या दिशेने विवेकने गाडी वळवली.

५ मिनट त ते दोघे lake वर पोचले पण

विवेक –“ अग काय सुन्दर जागा आहे ग ! बसू या इथे ५-१०मिनट?”

प्राची मानेनेच हो म्हणाली. ते अत्यन्त मूक होऊन पाण्यावरचे  विरत जाणारे तरंग कितीतरी वेळ बघत बसले.

अस्ताला जाणारा सूर्य बघून विवेक हळूच म्हणाला चल निघू या

प्राची मानेनेच हो म्हणाली.

पहिल्या ride हुन परत येताना दोघेही मूक होते.

प्राची च्या घरासमोर गाडी थांबली.

विवेक –“ अशा सुंदर संध्याकाळी परत मिळोत Bye.”

प्राची-“ इतक्या सुंदर ride बद्दल खूप thank you. This was my first ever ride and it was so memorable”

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा